सर्वोदय कॉलनीत सव्वाचार लाखांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:10 IST2021-07-10T04:10:29+5:302021-07-10T04:10:29+5:30

अमरावती : फ्रेजरपुरा ठाण्यांतर्गत सर्वोदय कॉलनीत अज्ञात आरोपीने घरफोडी करून ४ लाख ३३ हजार २५० रुपयांचे १४४ ग्रॅम सोन्याचे ...

Home burglary of lakhs in Sarvodaya Colony | सर्वोदय कॉलनीत सव्वाचार लाखांची घरफोडी

सर्वोदय कॉलनीत सव्वाचार लाखांची घरफोडी

अमरावती : फ्रेजरपुरा ठाण्यांतर्गत सर्वोदय कॉलनीत अज्ञात आरोपीने घरफोडी करून ४ लाख ३३ हजार २५० रुपयांचे १४४ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा नोंदविला.

फिर्यादी विजया दिनकरराव जोगे (३६,रा. सर्वोदय कॉलनी) यांनी फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली. त्या ८ जुलै रोजी दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास कपडे इतर घरगुती साहित्य खरेदीसाठी जयस्तंभ चौकात गेल्या होत्या. परत आल्यानंतर त्यांना घराच्या दाराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी लॉकरमध्ये ठेवलेले विविध प्रकारचे एकूण ४ लाख ३२ हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे लक्षात आले. अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३८०, ४५४ अन्वये गुन्हा नोंदविला. घटनेचा तपास ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Web Title: Home burglary of lakhs in Sarvodaya Colony