घर, बंगला, फ्लॅट धारकांनाही हवे घरकुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:16 IST2021-08-12T04:16:28+5:302021-08-12T04:16:28+5:30

पंतप्रधान आवास योजना पात्र लाभार्थ्यांना जिल्ह्यात लाभ अमरावती : आर्थिक मागासवर्गीय नागरिकांना हक्काचे घर मिळावे म्हणून प्रधानमंत्री आवास योजना ...

Home, bungalow, flat holders also want a house | घर, बंगला, फ्लॅट धारकांनाही हवे घरकुल

घर, बंगला, फ्लॅट धारकांनाही हवे घरकुल

पंतप्रधान आवास योजना पात्र लाभार्थ्यांना जिल्ह्यात लाभ

अमरावती : आर्थिक मागासवर्गीय नागरिकांना हक्काचे घर मिळावे म्हणून प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली. या योजनेत जिल्ह्याला १ लाख ७ हजार १७४ एवढे उद्दिष्ट देण्यात आले आहे. याकरिता ९८ हजार ६५२ लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात ८२ हजार ९७७ लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर करण्यात आले आहे. यानुसार पात्र लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ देण्यात आला असून, जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या घरकुलांची काही कामे पूर्ण झाले आहेत. काही कामे प्रगतीपथावर आहेत. या योजनेंतर्गत आर्थिक मागास प्रवर्गातील नागरिकांना घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. यामुळे त्यांना हक्काचे घर बांधण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध झाल्याने डोक्यावर छत उभे राहणार आहे. या योजनेसाठी आर्थिक मागास घटकातील नागरिकांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये घर, बंगला, फ्लॅट असलेल्यांचाही समावेश असून, पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

बॉक्स

पंतप्रधान योजनेचा लाभ कुणाला?

ज्यांचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपर्यंत आहे, अशा आर्थिक मागास घटकातील कुटुंबांना लाभ मिळू शकतो. वार्षिक उत्पन्न ३ लाख ते ६ लाख रुपयांपर्यंत असलेले कुटुंब व मध्यम उत्पन्न गटासाठी उत्पन्न ६ लाख ते १२ लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जातो. ईडब्ल्यूएस आणि एलआयजी वर्गातील महिला अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गाचा या यादीत समावेश होतो.

बॉक्स

पात्र अर्जदारांची जॉब कार्ड मॅपिंग

घरकुल अनुदान व्यतिरिक्त महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत ९० ते ९५ दिवसाच्या अकुशल मजुरीच्या स्वरुपात अर्थसहाय्य दिले जाते. लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी ९५ हजार अर्थसहाय्य दिले जाते. सन २०११ च्या आर्थिक वा सामाजिक व जात सर्वेक्षणाचे माहितीच्या आधारे लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील बेघर कच्चे घर असलेल्या कुटुंबांना अर्थसहाय्य देणे हा योजनेचा उद्देश आहे.

बॉक्स

अशी आहे घराची आकडेवारी

जिल्ह्यात आलेले एकूण अर्ज -९८६५२

गाडी बंगला नावावर असताना आलेले अर्ज-६८७१

मंजूर घरकुले -८२९७७

Web Title: Home, bungalow, flat holders also want a house