घरगुती २५९, सार्वजनिक २५४ होलिकादहन
By Admin | Updated: March 12, 2017 00:27 IST2017-03-12T00:27:07+5:302017-03-12T00:27:07+5:30
हिन्दू धर्माचा महत्त्वाचा सण असणाऱ्या होळीची जय्यत तयारी झाली असून यंदा शहरात २५९ घरगुती तर २५४ सार्वजनिक ठिकाणी होळीचे दहन केले जाणार आहे.

घरगुती २५९, सार्वजनिक २५४ होलिकादहन
शहरात चोख बंदोबस्त : ७३ ठिकाणी फिक्स पॉर्इंट लावून नाकाबंदी
अमरावती : हिन्दू धर्माचा महत्त्वाचा सण असणाऱ्या होळीची जय्यत तयारी झाली असून यंदा शहरात २५९ घरगुती तर २५४ सार्वजनिक ठिकाणी होळीचे दहन केले जाणार आहे. यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार असून शहर पोलिसांकडून ७३ ठिकाणी फिक्सपार्इंट लावून नाकाबंदी केली जाणार आहे.
होळी म्हणजे वसंतपंचमी भारतीय संस्कृतीतील एक मोठा सण आहे. सर्व रोगराईचे निराकरण करणारा हा सण असल्याचे पुरातन काळापासून समज आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीची जय्यत तयारी सुरू झाली आहे. अमरावतीकरांमध्ये होळी सणाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून होळीनंतरच्या रंग उत्सवाला शनिवारपासूनच सुरुवात झाल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले.
होळी सणासाठी सर्वत्र उत्साह
अमरावती : होळीच्या विधिवत पूजेचे साहित्य व रंग खरेदीसाठी बाजारपेठेतील प्रतिष्ठानात मोठी गर्दी होत आहे. शहरात घरगुती व सार्वजनिक होळीमध्ये राजापेठ हद्दीत ६३, कोतवाली हद्दीत २५, खोलापुरी गेट हद्दीत ५०, भातकुलीत २८, गाडगेनगरात ७१, नागपुरी गेटमध्ये २५, वलगावात ४६, फे्रजरपुरा हद्दीत ८५, बडनेरा हद्दीत ६५ व नांदगाव पेठ हद्दीत ५८ ठिकाणी होळीचे दहन केले जाणार आहे. बंदोबस्तासाठी ४ सहायक पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात १८ पोलीस निरीक्षक, २२ सहायक पोलीस निरीक्षक, ५२ पोलीस उपनिरीक्षक (१५ महिला पोलीस), २०० होमगार्ड, १०० महिला होमगार्ड, ५५० पोलीस कर्मचारी तसेच एसआरपीएफची १०० जवानांची एक कंपनी तैनात केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
खेळा इको फे्रंडली होळी
होळीसाठी हिरवे झाडे तोडल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होते. त्यामुळे सुकलेली लाकडांची होळी करा, असा संदेश निसर्गप्रेमीं दिला आहे. होळीसाठी टायर्स व रॉकेलचा उपयोग केल्यास प्रदूषण वाढण्याची शक्यता असते. पर्यावरणपुरक होळी साजरी करण्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन निसर्गप्रेंमीनी केले आहे.