होलिक्रॉसच्या अदिती-खुशबू अव्वल

By Admin | Updated: June 9, 2015 00:29 IST2015-06-09T00:29:22+5:302015-06-09T00:29:22+5:30

माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या फेब्रुवारी,मार्चच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा ...

Hollyros's Aditi-Fragrance Tops | होलिक्रॉसच्या अदिती-खुशबू अव्वल

होलिक्रॉसच्या अदिती-खुशबू अव्वल

अमरावती बोर्ड शेवटून दुसरे
जिल्ह्याचा निकाल ८५.१६ टक्के
अमरावती : माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या फेब्रुवारी,मार्चच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा आॅनलाईन निकाल सोमवारी घोषित झाला. यात जिल्ह्यात पुन्हा मुलीच वरचढ राहिल्यात. येथील होलीक्रॉस शाळेची विद्यार्थिनी अदिती प्रमोद शिरभाते व खुशबू अजय हेडा यांनी ९८.८० टक्के गुणांसह संयुक्तरीत्या जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला. असिर कॉलनीतील सैफी हायस्कूलची विद्यार्थिनी जवेरिया आलम दाऊद खान व मणिबाई गुजराथी हायस्कूलची विद्यार्थिनी श्रीया गणेश घुलक्षे या दोघींनी ९८.६० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक पटकावला. आजवर उज्ज्वल यशाची परंपरा राखणारे अमरावती विभागीय शिक्षण बोर्ड निकालात यावेळी मात्र शेवटून दुसरे राहिले.
गणेशदास राठी विद्यालयाचा विद्यार्थी प्रताप महाडीक याने ९८.४० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला. अमरावती जिल्ह्यातून ४५ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ४५ हजार ६९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पैकी ३८ हजार ९१७ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. गणेशदास राठी विद्यालय ९५.५० टक्के, होलिक्रॉस कॉन्व्हेंट ९८.४०, होलिक्रॉस मराठी शाळा ९८ टक्के, अरूणोदय शाळा १०० टक्के, बुलिदान राठी मूकबधिर विद्यालय १०० टक्के, भंवरीलाल सामरा इंग्लिश हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला. नारायणदास लढ्ढा हायस्कूल ९८ टक्के, तखतमल इंग्लिश स्कूल ९६ टक्के, मणिबाई हायस्कूल ९६.११ टक्के, गर्ल्स हायस्कूल ८७.०६, समर्थ हायस्कूलचा निकाल ९८.२८ टक्के लागला आहे. इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Hollyros's Aditi-Fragrance Tops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.