सुट्यांना ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2016 00:15 IST2016-10-27T00:15:16+5:302016-10-27T00:15:16+5:30

येथील प्रादेशिक वनविभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या वनरक्षक भरती प्रक्रियेदरम्यान २ ते ११ नोव्हेंबर...

Holidays 'break' | सुट्यांना ‘ब्रेक’

सुट्यांना ‘ब्रेक’

आदेश : वनरक्षक भरतीचा परिणाम
अमरावती : येथील प्रादेशिक वनविभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या वनरक्षक भरती प्रक्रियेदरम्यान २ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत वनाधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्यांना ‘ब्रेक’ लावण्यात आला आहे. दिवाळीनंतर होणाऱ्या वनरक्षक भरती प्रक्रियेचा फटका वनकर्मचाऱ्यांना बसणार आहे. त्याअनुषंगाने मुख्य वनसंरक्षकाने आदेश निर्गमित केले आहे.
प्रादेशिक वनविभागाच्या अधिपत्याखाली ६९ जागांसाठी ५ ते १० नोव्हेंबर दरम्यान वनरक्षक भरती प्रक्रिया राबविली जात आहे. इयत्ता १२ वी विज्ञान उत्तीर्ण असलेल्यांना भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. वनविभागाने वनरक्षक भरतीसाठी यापूर्वीच आॅनलाईन अर्ज मागविले आहे. ७९ वनरक्षकांच्या जागेसाठी सुमारे २६ हजार अर्ज प्राप्त झाल्याची माहिती आहे. स्थानिक नांदगाव पेठ येथील पंचताराकीत औद्योगिक वसाहत परिसरात ही भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. ५ ते १० नोव्हेंबर दरम्यान होऊ घातलेल्या वनरक्षक भरतीसाठी कोणत्याही उणिवा भासणार नाही, याचे सूक्ष्म नियोजन मुख्य वनसंरक्षक संजीव गौड करीत आहेत. ५ नोव्हेंबर रोजी रनिंग त्यानंतर चालचाचणी, शारिरीक चाचणी आणि पुढे निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे. भरती प्रक्रिया होईस्तोवर कोणत्याही कर्मचाऱ्यांना ५ ते १० नोव्हेंबर पर्यत रजा मंजुरी अथवा सुटी मिळणार नाही, असे आदेश सीसीएफने काढले आहे. त्यामुळे वनकर्मचाऱ्यांनी दिवाळीनंतर कौटुंबिक सहल, मौजमजा अथवा नातेवार्इंकाकडे भेटी देण्याचे नियोजन केले असेल तर या नियोजनावर विरजन येण्याची दाट शक्यता आहे. वनकर्मचाऱ्यांना सुटी नाही, असा फतवा काढताना केवळ अपवादात्मक स्थितीत सुटी देता येईल, असे संकेत मुख्य वनसंरक्षकांचे आहेत.

वनरक्षकांच्या ६९ जागांसाठी सुमारे २६ हजार अर्ज आले आहेत. शासन नियमावलीनुसार ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. वनविभागाने ५ ते १० या कालावधीत ही भरती पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.
- हेमंत मीना
उपवनसंरक्षक, अमरावती.

Web Title: Holidays 'break'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.