राजकमल चौकात तंबाखूजन्य उत्पादनांची होळी

By Admin | Updated: June 1, 2015 00:36 IST2015-06-01T00:36:04+5:302015-06-01T00:36:04+5:30

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त शहरात शनिवारी सकाळी रॅलीचे आयोजन करण्यात आले.

Holi of tobacco products in Rajkamal square | राजकमल चौकात तंबाखूजन्य उत्पादनांची होळी

राजकमल चौकात तंबाखूजन्य उत्पादनांची होळी

जनजागृतीसाठी रॅली : जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी
अमरावती : जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त शहरात शनिवारी सकाळी रॅलीचे आयोजन करण्यात आले. राजकमल चौकात तंबाखू निर्र्मित उत्पादनाची होळी करून यापुढे तंबाखू सेवन करणार नाही, अशी शपथ रॅलीत सहभागी असणाऱ्यांनी घेतली. जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील एनसीडी व डेन्टल कॉलेज अ‍ॅन्ड हॉस्पीटलच्या विदर्भ युथ वेलफेअर सोयायटीच्या संयुक्त विद्यमाने इर्विन चौक ते नेहरु मैदानापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली.
यावेळी अन्न व औषधी प्रशासनाचे शिवाजी देसाई, जिल्हा शल्य चिकीत्सक अरुण राऊत, नितीन धांडे, विनय गोहाड, श्रीरंग ढोले, नितीन भालेराव, अधिष्ठाता दिलीप जाणे, राम ढोंबरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, गोविंद कासट, विलास मराठे, दिनेश बुब यांची उपस्थिती होती. तसेच दंत महाविद्यालय, पीडीएमसी, विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय, तखतमल होमिओ कॉलेज, बडनेरा इंजिनीअरिंग कॉलेज, समाजकार्य महाविद्यालय, रोटरी क्लब, लायन्स क्लब, जेसीस, भारतीय दंत संघटना, निमा संघटनच्या आदी पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता. रॅलीत सहभागी असणाऱ्यांनी इर्विन ते नेहरू मैदानापर्यंत तबांखू विरोधी घोषणा करुन अमरावतीकरांचे लक्ष वेधले होते.
विद्यार्थी व पदाधिकाऱ्यांच्या हातात तबांखू विरोधात पोस्टर व बॅनर्स विविध घोष वाक्य लिहीण्यात आले होते. काही विद्यार्थ्यांनी तबांखू विरोधात पथनाट्यही सादर केले. जिल्हाधिकारी समक्ष नागरिकांनी यापुढे तबांखू सेवन करणार नाहीत. अशी शपथ सुध्दा घेतली. राजकमल चौकात तबांखूजन्य उत्पादनाची होळी करून निषेध नोंदविण्यात आला. इर्विन चौकातून निघालेली रॅलीचे नेहरू मैदानात समारोप झाला.

Web Title: Holi of tobacco products in Rajkamal square