तीन वर्षांत नऊ कोटींच्या गुटख्यांची होळी

By Admin | Updated: August 9, 2015 23:53 IST2015-08-09T23:53:21+5:302015-08-09T23:53:21+5:30

महाराष्ट्र राज्य शासनाने गुटख्यावर प्रतिबंध लावल्यानंंतरही काही ठिकाणी गुटख्यांची सर्रास विक्री तर काही ठिकाणी छुप्या मार्गाने विक्री केली जाते.

Holi of nine crore gutkha in three years | तीन वर्षांत नऊ कोटींच्या गुटख्यांची होळी

तीन वर्षांत नऊ कोटींच्या गुटख्यांची होळी

८८ जणांवर कारवाई:१०३ प्रकरणे न्यायालयात
अमरावती : महाराष्ट्र राज्य शासनाने गुटख्यावर प्रतिबंध लावल्यानंंतरही काही ठिकाणी गुटख्यांची सर्रास विक्री तर काही ठिकाणी छुप्या मार्गाने विक्री केली जाते. अन्न व औषधी प्रशासन विभागाने गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यातील विविध ठिकाणी धाडसत्र राबवून तब्बल नऊ कोटींचा गुटखा जप्त करून नष्ट केला आहे.
महाराष्ट्र शासनाने २०१२ पासून मनुष्यांच्या आरोग्यास घातक असलेल्या तंबाखू, तंबाखूजन्य व सुपारी युक्त उत्पादनावर बंद घातली आहे. बंदी लागू झाल्यानंतरही अमरावती जिल्ह्यात गुटख्यांची विक्री होत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. अन्न व औषधी प्रशासनाकडून गुटखा व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे सत्र सुरु आहे. मात्र, तरीही मोठ्या प्रमाणात गुटखा शहरात विक्री होत असल्याचे लक्षात येत आहे. मध्यंतरी नागपूर व औरंगाबाद येथील अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे अमरावती शहरात कारवाईचे धाडसत्र सुरू केले होते. मागील तीन वर्षांची आकडेवारीवर लक्ष दिल्यास अन्न व औषधी प्रशासन विभागाने २० जुलै २०१२ ते १९ जुलै २०१३ पर्यंत जिल्ह्यातील ११७ ठिकाणी धाडी टाकून गुटख्यांच्या मालाची तपासणी केली आहे. त्यामध्ये ५३ ठिकाणावरून ५ कोटी ७ लाख ९९ हजार ४८५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता. यामध्ये ११ व्यवसायिकांवर फौजदारी कारवाई करण्यात आली असून या वर्षात ५३ प्रकरणे न्यायालयात प्रविष्ठ करण्यात आले. त्याच प्रमाणे २०१३-१४ मध्ये २५३ ठिकाणी छापे टाकून ५० जणांकडून २ कोटी २ लाख ४ हजार ६३० रुपयांच्या गुटख्याचा माल जप्त करण्यात आला. त्यामध्ये ४८ जणांविरूध्द फौजदारी तर ५० प्रकरणे न्यायप्रविष्ट करण्यात आले. २०१४-१५ मध्ये आतापर्यंत ४८ ठिकाणी धाडी टाकून २९ जणांकडून १ कोटी ५ लाख २६ हजार २८५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला तर २६ जणांविरुध्द फौजदारीची कारवाई करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Holi of nine crore gutkha in three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.