भारिप बहुजन महासंघातर्फे कर्जमाफीच्या "जीआरची" होळी
By Admin | Updated: June 27, 2017 00:06 IST2017-06-27T00:06:56+5:302017-06-27T00:06:56+5:30
राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना जाचक अटीमुळे काहीच फायदा होणार नसल्याने ....

भारिप बहुजन महासंघातर्फे कर्जमाफीच्या "जीआरची" होळी
आंदोलन : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना जाचक अटीमुळे काहीच फायदा होणार नसल्याने सोमवारी भारिप बहुजन महासंघाने शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयाच्या जीआरची होळी करून संताप व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारिप बहुजन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या या धोरणाचा तीव्र निषेध नोंदविला आहे
राज्यातील भाजपा सरकारने निवडणुकीत जाहीर केल्याप्रमाणे भाजपा सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाने केली आहे. मात्र नुकतीचे शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे. राज्य शासनाने कर्जमाफीबाबत काढलेल्या अध्यादेशात वेगवेगळे निकष लावून अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचा एकमेव कार्यक्रम या निर्णयात राबविला आहे.त्यामुळे कुठल्याही शेतकरी कर्जमाफीला अटी व शर्ती न लावता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी तसेच शेतकऱ्यांना दहा हजार रूपयाची शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी आदी मागण्या यावेळी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष नंदेश अंबाडकर, माजी अध्यक्ष अनिल बरडे, रामभाऊ पाटील, सतीश सियाले, आनंद वरठे, विनायक दूधे, मिलिंद डोंगरे, चरणदास निकोसे, अशोक गोंडाणे आदींनी केल्या आहेत.