३१ लाखांच्या गुटख्याची होळी
By Admin | Updated: October 4, 2014 23:19 IST2014-10-04T23:19:56+5:302014-10-04T23:19:56+5:30
अन्न व औषध प्रशासन विभागाने १ जानेवारी ते ३० सप्टेंबरपर्यंतच्या कारवाईत जप्त केलेल्या ३१ लाख २६ हजार ४९७ रुपयांच्या गुटख्याची कम्पोस्ट डेपोत होळी केली.

३१ लाखांच्या गुटख्याची होळी
अमरावती : अन्न व औषध प्रशासन विभागाने १ जानेवारी ते ३० सप्टेंबरपर्यंतच्या कारवाईत जप्त केलेल्या ३१ लाख २६ हजार ४९७ रुपयांच्या गुटख्याची कम्पोस्ट डेपोत होळी केली.
महाराष्ट्रात गुटखा विक्रीला बंदी असतानाही अमरावती जिल्ह्यात गुटख्यांची सर्रास विक्री होत असल्याचे निदर्शनास येत होते. त्या अनुषंगाने अन्न व औषध विभागाने गुटखा व्यवसायिकांवर पाळत ठेवली होती. मागील वर्षी अन्न व औषध प्रशासन विभागाने ४८ लाखांचा गुटखा जप्त करुन संपूर्ण गुटखा जाळला होता. त्याप्रमाणे यावर्षातील १ जानेवारी ते ३० सप्टेंबरपर्यंत अन्न व औषधी प्रशासन विभागाने ६६ कारवाई करुन आतापर्यंत ३१ लाख २६ हजार ४९७ रुपयांचा गुटखा जप्त केला होता. लहान मोठ्या व्यापाऱ्याकडून हा गुटखा जप्त करण्यात आला असून त्यापैकी काही जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
१ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता अन्न व औषधी प्रशासन अमरावती विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त मिलिंद देशपांडे यांच्या नेतृत्वात दक्षता सेलचे अन्न सुरक्षा अधिकारी फरीद सिद्दीकी व जंयत वाणे यांच्यासह खोलापुरी गेट पोलीस कर्मचारी सुरेंद्र भोगे व विरु सराफ यांच्या देखरेखीत हा गुटखा भातकुली मार्गावरील कम्पोस्ट डेपो परिसरात जाळण्यात आला.