हात पकडून युवतीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:14 IST2021-04-01T04:14:43+5:302021-04-01T04:14:43+5:30
अमरावती : रस्त्यात थांबवून २० वर्षीय युवतीचा हात पकडला व दुसऱ्या आरोपीने ओढणी ओढून विनयभंग केल्याची घटना फ्रेजरपुरा ठाणे ...

हात पकडून युवतीचा विनयभंग
अमरावती : रस्त्यात थांबवून २० वर्षीय युवतीचा हात पकडला व दुसऱ्या आरोपीने ओढणी ओढून विनयभंग केल्याची घटना फ्रेजरपुरा ठाणे हद्दीतील बेनोडा येथे मंगळवारी घडली.
याप्रकरणी आरोपी सोन्या तायवाडे (३०), आकाश मनोहर सिरसाट (३०, दोन्ही रा. बेनोडा) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी युवती ही नांदगावपेठ येथे शिलाई मशीनचे काम करते. सदर युवतीचा दोन्ही आरोपी रोज पाठलाग करतात. ती मैत्रिणच्या घरी जात असताना एकाने तिला टॉन्ट मारला, तर दुसऱ्या वाईट नजरेने पाहून हात पकडून प्रेमाची गळ घातली. युवतीने आरडाओरड केल्याने आरोपी पळून गेल्याचे तिने ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीत नमूद आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३५४, ३५४ (ब) ३५४ (ड), ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.