धारणीचे सहायक प्रकल्प अधिकारी निलंबित

By Admin | Updated: March 23, 2015 00:24 IST2015-03-23T00:24:15+5:302015-03-23T00:24:15+5:30

येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील सहायक प्रकल्प अधिकारी

Holding Assistant Project Officer Suspended | धारणीचे सहायक प्रकल्प अधिकारी निलंबित

धारणीचे सहायक प्रकल्प अधिकारी निलंबित

राजेश मालवीय  धारणी
येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) यू.जी. पाटील यांना एका न्यायालयीन प्रक्रियेत उच्च न्यायालयात उत्तर दाखल करण्यासाठी प्राधिकृत केले होते. मात्र, गैरहजर राहिल्यामुळे उच्च न्यायालयाने शासनाला दोन हजारांचा दंड ठोठावला. या अवमाननेसाठी अप्पर आयुक्त आदिवासी विकास अमरावती यांनी एका आदेशान्वये पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. यावरून धारणीच्या आदिवासी प्रकल्प २कार्यालयाचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आला आहे. मेळघाटच्या बिबा येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षिकेने उच्च न्यायालयात न्यायासाठी याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने दिलेल्या तारखेवर न्यायालयात हजर राहून उत्तर सादर करण्यासाठी अप्पर आयुक्तांनी येथील सहायक प्रकल्प अधिकारी पाटील यांना प्राधिकृत केले होते. मात्र, ते उपस्थित राहिले नाहीत.

Web Title: Holding Assistant Project Officer Suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.