दिव्यांग कर्मचाऱ्यांचे अन्यायाविरोधात धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:26 IST2021-02-05T05:26:18+5:302021-02-05T05:26:18+5:30

अमरावती : न्याय मागण्यांसाठी सोमवारपासून जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कर्मचाऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. झेडपी दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमुख ...

To hold the disabled employees against injustice | दिव्यांग कर्मचाऱ्यांचे अन्यायाविरोधात धरणे

दिव्यांग कर्मचाऱ्यांचे अन्यायाविरोधात धरणे

अमरावती : न्याय मागण्यांसाठी सोमवारपासून जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कर्मचाऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

झेडपी दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा अधिनियम २०१६ राज्यात लागू झाल्यापासून जिल्हा परिषदेमध्ये एकाही विभागात दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी नेमलेला नाही. तो नियुक्त करावा, सन २०२० मध्ये झालेल्या पदोन्नतीमध्ये आरोग्यसेवक या प्रवर्गातून आरोग्य सहायक या पदावर झालेल्या पदोन्नतीमध्ये कायम दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती न देता तात्पुत्या दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असल्यामुळे झालेला अन्याय दूर करावा, दिव्यांग कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता यादी आरोेग्य विभागात अद्यापही प्रसिद्ध केली नाही. ती प्रसिद्ध करावी, दिव्यांग कर्मचारी दीपक सोनोने यांच्यावरील अन्याय दूर करावा आदी मागण्यांसाठी झेडपीसमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण, अतुल वानखडे, विवेक उमक, स्वप्निल सुपासे, गिरीधर गुल्हाने, अशोक पोकळे, विलास शिंदे, सोनोने, विनोद मसराम, प्रफुल्ल राऊत, प्रशांत राऊत, प्रमोद भोपसे, प्रवीण लाखेकर, वर्षा राठोड, पाटील आदींचा समावेश आहे.

Web Title: To hold the disabled employees against injustice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.