शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
2
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
3
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
4
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
5
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
6
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
7
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
8
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
9
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
10
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
12
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
13
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
14
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
15
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
16
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
17
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
18
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
19
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

प्राचार्यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:41 IST

शिवाजी चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये काही विद्यार्थ्यांसह युवकांनी प्राचार्यांना मारहाण करून खुर्च्यांची फेकफाक केल्याने शुक्रवारी सकाळी प्रचंड गोंधळ उडाला. गाडगेनगर पोलिसांनी विद्यार्थ्यांसह एकूण सहा युवकांविरुद्ध गुन्हा नोंदविला, तर तिघांना अटक केली.

ठळक मुद्देतीन विद्यार्थ्यांना अटक : डॉ.पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिट्यूटमधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शिवाजी चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये काही विद्यार्थ्यांसह युवकांनी प्राचार्यांना मारहाण करून खुर्च्यांची फेकफाक केल्याने शुक्रवारी सकाळी प्रचंड गोंधळ उडाला. गाडगेनगर पोलिसांनी विद्यार्थ्यांसह एकूण सहा युवकांविरुद्ध गुन्हा नोंदविला, तर तिघांना अटक केली. या गोंधळानंतर विद्यार्थ्यांचे दोन गट पडले. दीडशेवर विद्यार्थ्यांच्या गटाने प्राचार्यांना समर्थन दिले, तर दुसऱ्या गटातील शंभरावर विद्यार्थी प्राचार्यांच्या विरोधात होते.डॉ. पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिट्यूटमधील काही विद्यार्थ्यांनी गुरुवारी सायंकाळी प्राचार्यांसह विभागप्रमुखांविरोधात गाडगेनगर पोलिसांत तक्रार नोंदविली.प्राचार्य डॉ. वेदा विवेक व कोर्स को-आॅर्डिनेटर जिलस सुरेश हे मानसिक त्रास देत अपशब्दांचा वापर करीत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी तक्रारीतून केला. त्यावरून गाडगेनगर पोलिसांनी भादंविच्या कलम ५०४, ५०६ अन्वये अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे.शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास काही विद्यार्थ्यांसह युवकांनी महाविद्यालयाच्या लायब्ररी बैठक सुरु असताना प्रवेश केला. तेथे उपस्थित प्राचार्यांना थप्पड लगावण्यात आल्या तसेच मारहाण करून खुर्च्यांची फेकफाक केल्याने गोंधळ उडाला. या घटनेची तक्रार प्राचार्य वेदा पोलराज विवेक (४७) यांनी गाडगेनगर पोलिसांत नोंदविली. त्यावेळी प्राचार्य, विभागप्रमुख व दीडशेवर विद्यार्थी उपस्थित होते.तक्रारीवरून पोलिसांनी हेमंत राजू तिवारी, आकाश जयसिंगपुरे, अभिषेक गोडस या विद्यार्थ्यांविरुद्ध भादंविच्या कलम १४३, १४७, ३२३, ३५३ अन्वये गुन्हा नोंदविला. या घटनेनंतर प्राचार्य व विभागप्रमुखांचा विरोध करणाºया विद्यार्थ्यांनी रूट मार्च काढत मोर्चा पोलीस आयुक्तालयावर नेला. पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांना निवेदन देऊन न्यायाची मागणी केली. त्यावेळी शंभरावर विद्यार्थ्यांसोबत काही राजकीय क्षेत्रातील तरुण मंडळीही उपस्थित होती.शैक्षणिक संस्थेच्या महाविद्यालयात घडलेल्या या घटनेत प्राचार्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तीन जणांना ताब्यात घेतले आहे. काही विद्यार्थ्यांचेही निवेदन प्राप्त झाले. त्यांना वैयक्तिकरीत्या त्रास असेल, तर त्यांनी स्वतंत्रपणे तक्रार करायला हवी.यशवंत सोळंकेपोलीस उपायुक्त.मुलींना म्हणाले, ‘गरम पाण्यापेक्षा तुम्हीच हॉट’!नर्सिंग प्रशिक्षणातील विद्यार्थिनी काही समस्या घेऊन प्राचार्य किंवा विभाग प्रमुखाकडे गेल्या असता, त्यांच्याशी असभ्य भाष्य केले जात होते. एक विद्यार्थिनी गरम पाण्याची समस्या घेऊन गेल्यावर विभाग प्रमुखाने ‘गरम पाण्यापेक्षा तुम्हीच हॉट आहात’, असे लज्जा निर्माण करणारे भाष्य केले. विद्यार्थिनींच्या कपड्यांवरही विभाग प्रमुख व प्राचार्य असेच आक्षेपार्ह वक्तव्य करीत होते, असा आरोप विद्यार्थ्यांसोबत उभे ठाकलेल्या राजकीय संघटनेच्या युवकांनी केला आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय