येवदा : थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या विद्युत कंपनीच्या एका कनिष्ठ अभियंत्यास लाथाबुक्यांनी मारुन जखमी केल्याची घटना नुकतीच घडली. येवदा येथील विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता निलेश सुपरावजी रोठे हे आज आपल्या काही सहकार्यांसह थकीत बीलाच्या वसुलीसाठी रिना संदीप मामनकर (रा. ढोमणपुरा) यांच्या निवासस्थानी गेले होते. यावेळी त्या घरी एकट्या होत्या. वीज कंपनीच्या अधिकार्यांनी त्यांना शिविगाळ केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. याच कारणावरुन त्यांचे पती संदीप मामनकर यांनी निलेश रोठे यांना मारहाण केली. रोठे यांनी सुध्दा मारहाण केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी येवदा पोलिसांनी भादंविचे कलम २९४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच परस्पर विरोधी तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३५३, २९४, ५८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास येवद्याचे ठाणेदार मिलिंद कुमार बाहकर करीत आहेत. (वार्ताहर)
वीज कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यास मारहाण
By admin | Updated: May 13, 2014 23:10 IST