हिरपूर, सोनेगावची सीमा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:12 IST2021-04-18T04:12:01+5:302021-04-18T04:12:01+5:30

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील हिरपूर व सोनेगाव खर्डा येथील वाढत्या रुग्णांमुळे गावाची हद्द बंद करण्याची पाळी ...

Hirpur, Sonegaon border closed | हिरपूर, सोनेगावची सीमा बंद

हिरपूर, सोनेगावची सीमा बंद

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील हिरपूर व सोनेगाव खर्डा येथील वाढत्या रुग्णांमुळे गावाची हद्द बंद करण्याची पाळी प्रशासनावर आली आहे. तेथील सीमा सील करण्यात आली आहे. मागील आठवड्यात ही दोन्ही गावे कोरोना हॉटस्पॉट ठरली आहेत.

ग्रामस्थांनी या पार्श्वभूमीवर स्वत: कोरोना चाचणीसाठी पुढाकार घ्यावा तसेच प्रशासनाने रुग्णांबाबत कुठलीही हयगय करू नये, असे निर्देश आमदार प्रताप अडसड यांनी प्रशासनाला दिले आहेत. सोनेगाव खर्डा येथे अल्पवयीन कोरोना रुग्णांत वाढ झाली आहे. धामणगाव, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर तालुक्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. वाढत्या रुग्णांवर उपचार कुठे आणि कसे करायचे, याविषयी धामणगाव तालुक्यातील तीनही तालुका आरोग्य अधिकाऱ्यांशी आमदारांनी चर्चा केली औषधांची कमतरता भासू देऊ नका, अशा सूचना दिल्या.

Web Title: Hirpur, Sonegaon border closed