हिंदू धर्म रक्षणाचा ठराव

By Admin | Updated: January 31, 2015 23:10 IST2015-01-31T23:10:25+5:302015-01-31T23:10:25+5:30

विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त येथील बजरंग दल, विहिंपच्यावतीने बडनेरा मार्गावरील दसरा मैदान येथे शनिवारी पार पडलेल्या विशाल हिंदू संमेलनात जय श्रीराम, जय शिवरायांच्या

Hindu Dharma Resolve Resolution | हिंदू धर्म रक्षणाचा ठराव

हिंदू धर्म रक्षणाचा ठराव

गोहत्या थांबवा : ‘जय श्रीराम’ घोषांनी दुमदुमला हिंदू संमेलनाचा आसमंत
अमरावती : विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त येथील बजरंग दल, विहिंपच्यावतीने बडनेरा मार्गावरील दसरा मैदान येथे शनिवारी पार पडलेल्या विशाल हिंदू संमेलनात जय श्रीराम, जय शिवरायांच्या जयघोषांनी आसमंत दुमदुमून गेला. संत, महंतांची उपस्थिती डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. यावेळी हिंदू धर्म रक्षणाचा ठराव पारित करण्यात आला.
संमेलनाची सुरुवात गोमाता पूजनाने करण्यात आली. दीप प्रज्ज्वलनानंतर राम, सीता, लक्ष्मण आणि शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन झाले. वेद पठण गणेश महाराज यांनी केले.
धर्मपीठावर गोंविद गिरी महाराज, जितेंद्रनाथ महाराज, राजेश्वर माऊली महाराज, किशोर व्यास, भंते चंद्रमनी, विहिंपचे प्रांताध्यक्ष विजय वालीया, जनार्धनपंत बोथे, नंदलाल खत्री, विजयकृष्ण महाराज, मुकेशनाथ महाराज, हभप शालिकराम महाराज, माधवदास महाराज, रामपंत जोशी महाराज, रामअवतार अग्रवाल, हरिओम अग्रवाल, दादाराव भडके, चंद्रकांत भोंदू, बलराम पातालबंशी, गुलाबराज महाराजांचे पंतू राजाभाऊ मोहोड, अटल पांडे, महेश पिंजाणी आदी उपस्थित होते.
यावेळी बडनेरा येथील राजेश्वर युनियन हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी ‘शिवराय जल्लोष’ हे नृत्य सादर करुन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या नृत्याचे सादरीकरण मुख्याध्यापिका रश्मी मोंहिदेकर यांच्या मार्गदर्शनात सत्यम रार्घोते, मनीषा राऊत, मोहन खांदे, प्रमोद काळे, अनिल मोर आदींनी केले.

Web Title: Hindu Dharma Resolve Resolution