अचलपुरात नेहरू युवा केंद्राच्यावतीने हिंदी पखवाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:16 IST2021-09-17T04:16:39+5:302021-09-17T04:16:39+5:30
अचलपूर : स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर नेहरू युवा केंद्राच्यावतीने अचलपुरातील ...

अचलपुरात नेहरू युवा केंद्राच्यावतीने हिंदी पखवाडा
अचलपूर : स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर नेहरू युवा केंद्राच्यावतीने अचलपुरातील नौबागपुरा येथील नगर परिषद प्राथमिक शाळेत हिंदी भाषा दिनानिमित्त ‘वक्तृत्व स्पर्धा व त्याचे महत्त्व’ या विषयावर प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक उमेश येवले होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष परतेकी व नेहरू युवा केंद्राच्या तालुका समन्वयक भारती सोनोने उपस्थित होत्या. जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम घेण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. यावेळी भारती सोनोने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत हिंदी भाषा व वक्तृत्वकलेचे महत्त्व पटवून दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होत हिंदी भाषेमध्ये वक्तृत्व सादर केले. यावेळी नेहरू युवा केंद्राच्यावतीने या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी नेहरू युवा केंद्र व नगर परिषद प्राथमिक शाळेचे सहकार्य लाभले.
150921\2648img-20210915-wa0102.jpg
अचलपुरात नेहरू युवा केंद्राच्या वतीने हिंदी फक्त वाडा