हिलर्सच्या कार्याने पाषाणाच्या भिंतीलाही फुटला पाझर
By Admin | Updated: January 22, 2017 00:12 IST2017-01-22T00:12:33+5:302017-01-22T00:12:33+5:30
ज्यांनी गुन्हा केला नाही असे लहान मुले आपल्या आई-वडिलांपासून दूर आहेत, ...

हिलर्सच्या कार्याने पाषाणाच्या भिंतीलाही फुटला पाझर
कारागृह अधीक्षक : हृदयस्पर्शी कार्यक्रम
अमरावती : ज्यांनी गुन्हा केला नाही असे लहान मुले आपल्या आई-वडिलांपासून दूर आहेत, अशा लहान मुलांचा व बंदीजनांचा गळाभेट कार्यक्रम तुरूंग अधीक्षक भाईदास ढोले व त्यांच्या सहकार्यांनी घडवून आणला. या हृदयस्पर्शी घटनेचा जनमाणसावर प्रभाव पडला व त्याचीच फलश्रुती म्हणून हिलर्स होमिओ वेलफेअर असोसिएशनने कारागृह अधीक्षकांचा गौरव केला.
यावेळी हिलर्सच्या महिला ग्रुपद्वारा महिला बंदीजनांना तिळगूळ व ब्लँकेट वाटप करण्यात आले. यावेळी महिला बंदीजनांसाठी उखाणे स्पर्धा घेण्यात आली. संघटनेचे संतोष राठी, शरद जुनघरे, संदीप नाफडे, अनिल जयस्वाल, शशांक दुबे, योगेश जयस्वाल, कौस्तुभ ठाकरे, अतुल येळणे, विलास मोडक, नितीन चोरे आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)