प्रहारचा हिवरखेडला चक्काजाम

By Admin | Updated: December 12, 2015 00:19 IST2015-12-12T00:19:44+5:302015-12-12T00:19:44+5:30

शेतकऱ्यांच्या कापसाला प्रती क्विंटल १० हजार रुपये हमीभाव देण्यासोबतच शेतकरी हिताचा स्वामिनाथन आयोगाला अहवाल सादर होऊनही तो लागू झाला नाही.

Hikarkhedla Chakkzam of the Pahara | प्रहारचा हिवरखेडला चक्काजाम

प्रहारचा हिवरखेडला चक्काजाम

कापसाला १० हजार रुपये हमीभाव : बच्चू कडू मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यापुढे विकणार ट्रकभर संत्री
मोर्शी : शेतकऱ्यांच्या कापसाला प्रती क्विंटल १० हजार रुपये हमीभाव देण्यासोबतच शेतकरी हिताचा स्वामिनाथन आयोगाला अहवाल सादर होऊनही तो लागू झाला नाही. त्यामुळे प्रहार युवाशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ.बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी शुक्रवारी मोर्शी तालुक्यातील हिवरखेड येथे चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनादरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
रास्ता रोको आंदोलनाला दुपारी ११ वाजता सुरुवात झाली. आंदोलनात सुमारे पाच ते सहा हजार शेतकरी सहभागी झाले होते. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सातवे वेतन आयोग लागू करण्याच्या तयारीत असून आता चपराशाला ६०० रुपये रोज व जिल्हाधिकाऱ्यांना २ लाखापर्यंत वेतन होणार आहे. रोजगार हमी योजनेच्या शेतकऱ्यांना मात्र १६२ रुपये मजुरी मिळत आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या परिसरात होत आहे. अपंगांना महिन्याकाठी १ हजार रुपये मानधन देण्यात यावे अशा आदी मागण्यांचा समावेश होता.
प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा जि.प.सदस्य बाळासाहेब वाकोडे, वसू महाराज, अरुण अमृते, गजानन वाघमारे, राजू कोकरे, अनिल खांडेकर, मंजूषा खांडेकर, साजेदा परवीन, वैशाली राईकवार, नारायण मेंढे यांची उपस्थिती होती. शेतकऱ्यांनी शेतमालाला उत्पादन खर्चानुसार हमी भाव देण्याची मागणी प्रहारच्या नेत्यांनी केली. तसेच राज्य शासनाविरोधातही जोरदार नारेबाजी करण्यात आली.
यावेळी बच्चू कडू यांनी येत्या २२ डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर एक ट्रकभर संत्री नेऊन मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनादरम्यान मोर्शी-वरुड मार्गावर ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते.
आंदोलनात मिरा राठी, गजानन धनसांडे, नाना राऊत, नारायन डोळस, किशोर खडसे, मंगेश बोराळकर, चरणदास परतेती, सुनील अढाऊ, दुर्गा मेश्राम, नरेंद्र सोनागले, गंगाधर ढोकणे, श्रणीत राऊत, मारोतराव श्रीरामे, गंगाधर गावंडे, पप्पू पाटील, गिरीधर वासनकर, शंकरराव पाचारे, शेषराव काटोलकर यांच्यासह प्रहारचे पदाधिकारी व हजारो शेतकरी बांधव उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Hikarkhedla Chakkzam of the Pahara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.