भांडवलदारांच्या हितासाठीच महामार्ग
By Admin | Updated: March 5, 2017 00:17 IST2017-03-05T00:17:26+5:302017-03-05T00:17:26+5:30
शेतकऱ्यांच्या अल्प किंमतीत जमीनी घेवून उभारण्यात येणारा कृषी समृध्दी महामार्ग हा भांडवलदारांच्या लाभासाठी होत आहे.

भांडवलदारांच्या हितासाठीच महामार्ग
वीरेंद्र जगतापांचा आरोप : महामार्ग विरोधी संघर्ष रॅलीत शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
धामणगाव रेल्वे/ शिवनी रसुलापूर : शेतकऱ्यांच्या अल्प किंमतीत जमीनी घेवून उभारण्यात येणारा कृषी समृध्दी महामार्ग हा भांडवलदारांच्या लाभासाठी होत आहे. हा महामार्ग तयार करण्याऐवजी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची मागणी आ़विरेंद्र जगताप यांनी केली.
नागपूर येथून निघालेल्या महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या रॅलीचे तालुक्यात आष्टा येथे आगमन झाले यावेळी या रॅलीत शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ़विरेंद्र जगताप होते. यावेळी रॅलीत तुकाराम भस्मेसह अनेकांची उपस्थिती होती़ मुंबई येथे समुद्रमार्गाने येणारा भांडवलदारांचा पक्कामाल नागपूरात व येथून मुंबईत पोहचविल्या जाणाऱ्या मालासाठी हा महामार्ग उभारला जात आहे़परदेशी कंपन्याना या महामार्गाचा उपयोग होणार आहे़ एकीकडे शेतमालास भाव नाही, हरभरा, तूर खरेदी केंद्राची अवस्था बिकट आहे़ शेतकऱ्यांचा जीव जात असतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस शेतकऱ्यांच्या जीवावर उठून हा महामार्ग उभारत आहे़ महामार्ग उभारल्यापेक्षा या रककमेतून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे अशी मागणी आ़विरेंद्र जगताप यांनी केली आहे़ धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या तिन्ही तालुक्यातील एकही शेतकरी महामार्ग उभारण्यासाठी जमीनीचा तुकडाही देणार नाही. प्रशासनाने अधीक दबाव टाकण्याचे काम केल्यास जशास तसे उत्तर देण्यास सर्व शेतकरी समर्थ आहे व शेतकरी आपल्या पाठीशी असल्याचे आ़जगताप यांनी महामार्ग संघर्षविरोधी रॅलीत बोलताना सांगीतले. (प्रतिनिधी)