महामार्गांवर झळकले सूचना फलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 06:00 IST2019-12-07T06:00:00+5:302019-12-07T06:00:29+5:30
अमरावती हिंगणघाट राज्य महामार्गावर भरधाव वाहने धावत असल्याचे निरीक्षण वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर आणि चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी नोंदविले. सबब, वन्यप्राण्यांच्या अपघातापासून बचाव होण्यासाठी अमरावती-चांदूर रेल्वे महामार्गावर एकूण दहा सूचना फलके राज्य मार्गाच्या कडेला लावण्यात आले. अमरावती पाचशे क्वॉर्टर्सपासून राखीव जंगल सुरू होते.

महामार्गांवर झळकले सूचना फलक
अमोल कोहळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पोहरा (बंदी) : वडाळी आणि चांदूर रेल्वे या दोन्ही वनपरिक्षेत्रात बिबट्यांची संख्या वाढत असून तृणभक्षी प्राण्यांचा मोठ्या संख्येने वावर आहे. अन्नसाखळी सहज उपलब्ध होत अअसल्याने हा परिसर वन्यजीवांसाठी अनुकुल आहे. त्याअनुषंगाने नागरिक व वाहनचालकांना सजग राहण्याच्या सूचना वनविभागाने केल्या आहेत. तसेच १० सूचनाफलके महामार्गांवर लावण्यात आले आहेत.
अमरावती हिंगणघाट राज्य महामार्गावर भरधाव वाहने धावत असल्याचे निरीक्षण वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर आणि चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी नोंदविले. सबब, वन्यप्राण्यांच्या अपघातापासून बचाव होण्यासाठी अमरावती-चांदूर रेल्वे महामार्गावर एकूण दहा सूचना फलके राज्य मार्गाच्या कडेला लावण्यात आले. अमरावती पाचशे क्वॉर्टर्सपासून राखीव जंगल सुरू होते. ते क्षेत्र पुढे चांदूर रेल्वेपर्यंत आहे. या जंगलात विविध प्रजातीच्या वन्यपशूंचे वास्तव्य आहेत. राखीव जंगलात एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात मुक्त विहार करताना वन्यप्राण्यांना राज्य महामार्ग ओलांडावा लागतो. हा महामार्ग ओलांडताना वन्यप्राण्यांचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर वडाळी आणि चांदूर रेल्वे वनविभागाने उपाययोजना केल्या. रस्ता अपघातात वन्यप्राण्यांचा मृत्यू टाळण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सार्वजनिक बांधकाम विभागाला गतिरोधक बसविण्यासंदर्भात पत्र दिले असून या महामार्गावर रस्त्याच्या कडेला सूचना फलक लावण्यात आल्याची माहिती पोहराबंदीचे वर्तुळ अधिकारी पी.टी.वानखडे यांनी दिली.