उस्मानाबादच्या कंदी पेढ्याला सर्वाधिक मागणी
By Admin | Updated: October 6, 2016 00:31 IST2016-10-06T00:31:29+5:302016-10-06T00:31:29+5:30
विदर्भाची कुलस्वामीनी व अंबानगरीचे आराध्य दैवत अंबा- एकवीरा देवी माता मंदीरात दर्शनासाठी पाचव्या दिवसीही लाखो भक्तांची अलोट गर्दी उसळली आहे.

उस्मानाबादच्या कंदी पेढ्याला सर्वाधिक मागणी
अंबादेवी परिसरात २५ विक्रेते : ३०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री
अमरावती : विदर्भाची कुलस्वामीनी व अंबानगरीचे आराध्य दैवत अंबा- एकवीरा देवी माता मंदीरात दर्शनासाठी पाचव्या दिवसीही लाखो भक्तांची अलोट गर्दी उसळली आहे. परिसरात अनेक खाद्यपदार्थांचे व विविध वस्तूंचे दुकाने लागली असून या ठिकाणी पाथ्रुड, उस्मानाबाद येथील कुंदा पेढ्याला विशेष मागणी असल्याचे निदर्शनास आले आहे.
२४० ते ३०० रुपये किलो प्रमाणे हा पेढा विकल्या जात आहे. प्रसाद म्हणून भाविक हा पेढा विकत घेत आहेत. शुध्द खव्यापासून हा पेढा तयार केला जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. अंबादेवी मंदिर परिसरात नवरात्र उत्सव सुरु झाल्यापासून सदर पेढे विक्रेते अंबानगरीत दाखल झाले आहे. परिसरात उस्मानाबादचे २० ते २५ पेढे विक्रेते या ठिकाणी आले आहे. नवरात्रोउत्सवाच्या १० दिवसांत लाखो रुपयांच्या पेढ्याची विक्री होत असल्याची माहिती आहे. कमी साखरेच्या पेढ्याला प्रतिकिलो ३०० रुपये दराने भाव मोजावे लागत असल्याचे चित्र आहे. कंदी पेढ्याला भाविकांची देखील पसंती आहे.
कुंदा पेढा हा शुध्द खव्या पासून तयार केला जातो. उस्मानाबाद येथून २० ते २५ पेढे विक्रेते दाखल झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी उलाढाल कमी आहे.
-विनोद गावंडे पाथ्रुड, उस्मानाबाद