नऊ महसूल मंडळात अतिवृष्टी

By Admin | Updated: July 28, 2016 00:06 IST2016-07-28T00:06:57+5:302016-07-28T00:06:57+5:30

जिल्ह्यात २४ तासात अचलपूर व चांदूर रेल्वे तालुक्यांसह ९ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली.

High revenue in the nine revenue board | नऊ महसूल मंडळात अतिवृष्टी

नऊ महसूल मंडळात अतिवृष्टी

 ५५ घरांची पडझड : सरासरी ४२.६ मि.मी. पाऊस
अमरावती : जिल्ह्यात २४ तासात अचलपूर व चांदूर रेल्वे तालुक्यांसह ९ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. या दोन्ही तालुक्यात ५५ घरांची पडझड झालेली आहे. एका दिवसात धरणांच्या सरासरी साठ्यात ७ दलघमीने वाढ झाली. मध्यप्रदेशातून पाण्याची आवक (येवा) अधिक असल्याने उर्ध्व वर्धा धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात २४ तासात सरासरी ४२.६ मिमी पाऊस पडला आहे. यामध्ये सर्वाधिक ९२.६ मि.मी. पाऊस चांदूररेल्वे व ९२.४ मि. मी.पाऊस अचलपूर तालुक्यात ८२.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. हा पाऊस ६५ मि. मी. पेक्षा जास्त असल्याने अतिवृष्टी समजण्यात येतो. उर्वरित तालुक्यांमध्ये अमरावती ६० मि. मी. भातकुली ३८.६, नांदगांव खंडेश्वर ४८.२, धामणगांव ५२, तिवसा १५, मोर्शी २३.३, वरुड २७, चांदूरबाजार १२, दर्यापूर ६०.६, अंजनगांव सुर्जी १०, धारणी २३ व चिखलदरा तालुक्यात ४६ मि. मी पाऊस पडला आहे.
जिल्ह्यात १ जून ते २७ जुलै दरम्यान पावसाची ३८६.८ मि. मी पावसाची सरासरी अपेक्षित असताना ६०५.५ मि. मी. पाऊस पडला आहे. ही १५६ टक्केवारी आहे. आतापर्यंत सर्वाधिक ८५९.६ मि. मी. पाऊस धारणी तालुक्यात पडला. अमरावती तालुक्यात ५२१.७ मि. मी, भातकुली ४९६.४, नांदगांव ५१४.७, चांदूररेल्वे ५७८.३, धामणगांव ५६३, तिवसा ६२३, मोर्शी, ७४१.२, वरुड ४७६.२, अचलपूर ६४१.९, चांदूरबाजार ५६१.२, दयापूर ६२३.९, अंजनगांव सुर्जी ५०१.८ व चिखलदरा तालुक्यात ७७४.२ मि.मी. पाउस पडला आहे.
येत्या २४ तासात जिल्ह्यासह विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता नागपूर विमानतळाच्या हवामान विभागाने वर्तविली आहे. गेल्या १० दिवसापासून सतत सुरु असलेल्या पावसामुळे पिकाच्या बरोबरीने तण वाढले आहे. तसेच पिकांवर किड व रोंगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या पावसामुळे अनेक शेतात पाणी साचले आहे. पीके पिवळी पडू लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे ठाकले आहे. (प्रतिनिधी)

८२ जलप्रकल्पांमध्ये ६९.२० टक्के साठा
जिल्ह्यात उर्ध्व वर्धा या मुख्य व शहानूर, चंद्रभागा, पूर्णा व सापन हे मध्यम व इतर ७७ लघुप्रकल्पात ६९.२० टक्के आजचा जलसाठा आहे. या सर्व प्रकल्पाची संकलीत पातळी ९०५.८५ दलघमी असताना सद्य:स्थितीत ६२६.३७ दलघमी संकलीत पातळी ९०५.८५ दलघमी जलसाठा आहे. मागच्या वर्षी याच दिनांकाला ४३८.१० दलघमी साठा होता. ही ४८.४० टक्केवारी होती.

या मंडळात अतिवृष्टी
जिल्ह्यात २४ तासात ९ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. यामध्ये धारणी तालुक्यातील हरिसाल मंडळात ६५.२ मि.मी., सावलीखेडा ८०.२, दर्यापूर तालुक्यात वडनेर गंगाई ७६.२, थिलोरी ८५.१, अचलपूर तालुक्यात अचलपूर८२.४, परतवाडा १०९.२, तिवसा तालुक्यात वऱ्हा ६६.६,चांदूर रेल्वे ९८.६ मि.मी. पाऊस पडला आहे.

दोन धरणांचे गेट उघडले
सद्य:स्थितीत पूर्णा व सापन या प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आली आहे. तर उर्ध्व वर्धा धरणाचे दरवाजे कुठल्याही क्षणी उघडल्या जाणार आहे. पूर्णा प्रकल्पाची ३ दरवाजे १०.से.मी. ने उघडण्यात आले. येथे १३.४५ घमीप्रसे विसर्ग सुरु आहे. सापन प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले. येथे ८.७२ घमीप्रसे पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

Web Title: High revenue in the nine revenue board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.