रिध्दपूर बसथांब्यावर लागले हायमास्ट दिवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:14 IST2021-05-11T04:14:13+5:302021-05-11T04:14:13+5:30

मोर्शी : महानुभाव पंथाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र रिद्धपूर येथे बसथांबा परिसरातील हायमास्ट दिवे लावण्यात आले आहेत. ...

High mast lights were installed at Ridhpur bus stand | रिध्दपूर बसथांब्यावर लागले हायमास्ट दिवे

रिध्दपूर बसथांब्यावर लागले हायमास्ट दिवे

मोर्शी : महानुभाव पंथाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र रिद्धपूर येथे बसथांबा परिसरातील हायमास्ट दिवे लावण्यात आले आहेत. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा दक्षता समितीचे अध्यक्ष प्रमोद हरणे यांनी याविषयीची तक्रार संबंधिताना दिली होती.

एच. जी. इन्फ्रा कंपनीच्यावतीने मोर्शी ते चांदूरबाजार हा सिमेंट रोड जवळपास पूर्णत्वास गेला असून, रिद्धपूर येथे रोडचे रुंदीकरणाची मागणी त्यावेळी ग्रामस्थांनी केली होती. मात्र, रस्ता दुभाजकावर हायमास्ट लाईट न बसविता ते रोडच्या दुसऱ्या बाजूला बसविण्यात आल्याने रस्त्यावर पाहिजे तसा प्रकाश पडत नव्हता. परिणामी अपघाताचे प्रमाण वाढत होते. त्याअनुषंगाने कंपनीकडे पाठपुरावा करून ते पथदिवे आता दुभाजकावर बसविण्यात आले आहे.

Web Title: High mast lights were installed at Ridhpur bus stand