गुंगीचे औषध देऊन महिलेवर अतिप्रसंग
By Admin | Updated: March 30, 2016 00:42 IST2016-03-30T00:42:23+5:302016-03-30T00:42:23+5:30
गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार केल्याची घटना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.

गुंगीचे औषध देऊन महिलेवर अतिप्रसंग
पीडीएमसीतील घटना : बहिणीच्या बदनामीची धमकी
अमरावती : गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार केल्याची घटना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी पीडित महिलेने सोमवारी दाखल केलेल्या तक्रारीवरून दिनेश किसन सावळे (३६, रा. सिध्दार्थनगर) या आरोपीला अटक केली आहे.
पीडित महिला पतीपासून विभक्त असून तिला एक पाच वर्षांची मुलगी आहे. ती आरोपी दिनेश सावळेकडे कॅटरर्सच्या कामावर होती. आठ महिन्यापूर्वी पीडित महिला आरोपीसोबत पीडीएमसीत कॅटरर्सचे काम करीत होती. दरम्यान आरोपीने पीडितेला बाहेर नेऊन तिला गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
त्यानंतर अनेकदा आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे. यातून महिला गर्भवती झाली. आरोपी हा पीडितेला तिच्या बहिणीची बदनामी करण्याची धमकी देत होता. त्यामुळे आजपर्यंत तिने तक्रार केली नाही. मात्र, अखेरीस तिने धाडस करून सोमवारी गाडगेनगर पोलीस ठाणे गाठून आरोपी दिनेश सावळेविरुध्द तक्रार नोंदविली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ३७६, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत. कॅटरर्सचे काम करीत असताना या महिलेचे लैंगिक शोषण करण्यात आले. आठ महिन्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)