शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू कडू यांच्या अपात्रतेला हायकोर्टाने दिली स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 12:28 IST

८ जुलैला अंतिम सुनावणी : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाबाबत अंतरिम दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याचे माजी मंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदाकरिता अपात्र ठरवणाऱ्या वादग्रस्त आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी मंगळवारी अंतरिम स्थगिती दिली. तसेच, या प्रकरणावर येत्या ८ जुलै रोजी अंतिम सुनावणी निश्चित केली.

कडू यांनी २०१७ मध्ये नाशिक येथे सामाजिक प्रश्नांकरिता आंदोलन केले होते. त्यामुळे सुकरवाडा पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे इत्यादी गुन्हे दाखल केले होते. त्या गुन्ह्यात २०२१ मध्ये सत्र न्यायालयाने कडू यांना एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. त्यामुळे संस्थांच्या विभागीय सहकारी सहनिबंधकांनी गेल्या १६ जून रोजी वादग्रस्त आदेश जारी करून कडू यांना पाच वर्षांकरिता अपात्र ठरविले. त्याविरुद्ध कडू यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हा आदेश अवैध आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. कडू यांच्यातर्फे अॅड. रवींद्र खापरे व अॅड. पराग कडू तर, तक्रारकर्त्यांतर्फे अॅड. हरीश डांगरे व अॅड. ऋग्वेद ढोरे यांनी कामकाज पाहिले. 

तक्रारीमुळे कारवाईहरिभाऊ मोहोड व इतर ११ संचालकांनी विभागीय सहनिबंधकांकडे तक्रार दाखल करून कडू यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली होती. एक वर्ष कारावासाची शिक्षा झाल्यामुळे सहकार कायद्यानुसार ते अध्यक्षपदी कायम राहू शकत नाही, असा दावा तक्रारीत करण्यात आला होता. ती तक्रार मंजूर करून कडू यांना अपात्र ठरविण्यात आले.

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूHigh Courtउच्च न्यायालयAmravatiअमरावती