गरजूंना शस्त्रक्रियेसाठी पोपट फाऊंडशनचा मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:16 IST2021-08-26T04:16:03+5:302021-08-26T04:16:03+5:30
अमरावती : लहान-मोठ्या आजारात करावी लागणारी शस्त्रक्रिया गरीब कुटुंबांना पैशाअभावी शक्य नसते. त्यामुळे कायमचे अपंगत्व सोसणाऱ्या अशा गरजूंना नाक, ...

गरजूंना शस्त्रक्रियेसाठी पोपट फाऊंडशनचा मदतीचा हात
अमरावती : लहान-मोठ्या आजारात करावी लागणारी शस्त्रक्रिया गरीब कुटुंबांना पैशाअभावी शक्य नसते. त्यामुळे कायमचे अपंगत्व सोसणाऱ्या अशा गरजूंना नाक, कान, डोळे, दात आदींच्या शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या पैशाची तरतूद मंगलभाई पोपट फाऊंडेशनतर्फे केली जाणार आहे. याचा लाभ गरिबांनी घेण्याचे आवाहन मदतीच्या रघुवीर प्रतिष्ठानचे संचालक चंद्रकांत पोपट यांनी केले. यासाठी राजापेठ स्थित कार्यालयात मंगलभाई पोपट फाऊंडेशनची स्थापना नुकतीच करण्यात आली आहे.
त्यावेळी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. तेजस पोपट, वसंत ठक्कर, डॉ. नंदकिशोर लोहाणा, सुरेश वसानी, तुषार पोपट, गोपाल पोपट यांच्याद्वारा ही रक्कम उपलब्ध केली जाणार आहे. याअंतर्गत पहिल्याच दिवशी ६ रुग्णांना डॉ. नंदकिशोर लोहाणाद्वारा तपासणी करून शस्त्रक्रियेसाठी मदत देण्यात आली. गरजूंनी याचा लाभ घेण्याचे आवाहन पोपट यांनी केले आहे.
या फाऊंश्शनमध्ये चंदू वानखडे, रेखा वर्धे, वंदना शिरसाट, शाहूराव शेजव (मूर्तिजापूर, अकोला), शीलाबाई मुंगृटराव शेजव (मूर्तिजापूर, अकोला), स्नेहा रूपेशराव बोबड़े (वरूड) यांचा समावेश आहे.