काँग्रेस कमिटीतर्फे मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:11 IST2021-06-02T04:11:59+5:302021-06-02T04:11:59+5:30
मोर्शी : वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ म्हणून ३१ मे रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी ...

काँग्रेस कमिटीतर्फे मदतीचा हात
मोर्शी : वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ म्हणून ३१ मे रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मोर्शी तालुका काँग्रेस कमिटीतर्फे उपविभागीय अधिकारी हिंगोले यांच्यामार्फत कोरोना आपत्ती निवारणार्थ एक हात मदतीचा म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीला ३०,००० रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी रमेश काळे अध्यक्ष, मोर्शी तालुका काँग्रेस कमिटी, प्रकाश टेकाळे माजी सभापती जि. प. अमरावती, धनंजय तट्टे संचालक, संजय कळस्कर, गजानन तायवाडे, अभिजित मानकर माजी उपसभापती पं. स. मोर्शी, सुनंदा तांदळे अध्यक्ष, महिला काँग्रेस कमिटी मोर्शी, मनोज टेकाळे, डॉ गजानन चरपे, गजानन ठवळी, प्रवीण काळमेघ, माधव टोपले, छोटू अब्रोल, भैया वानखडे, राजेश पाथरे, किशोर देशमुख, विलास चौधरी, प्रवीण कडू, नीलेश तट्टे, राजेश मोंढे, पवन काळमेघ अध्यक्ष, मोर्शी तालुका युवक काँग्रेस, नीलेश बेहेरे, रूपेश राऊत, शुभम वसू, रोशन वानखेडे उपस्थित होते.