आगग्रस्त कुटुंबीयांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:07 IST2021-03-29T04:07:42+5:302021-03-29T04:07:42+5:30

मोर्शी : तालुक्यातील श्रीक्षेत्र सालबर्डी येथील मोलमजुरी करणाऱ्या सुनील धुर्वे यांच्या घराला अचानक आग लागली. यात सिलेंडरचा स्फोट होऊन ...

A helping hand to the bereaved families | आगग्रस्त कुटुंबीयांना मदतीचा हात

आगग्रस्त कुटुंबीयांना मदतीचा हात

मोर्शी : तालुक्यातील श्रीक्षेत्र सालबर्डी येथील मोलमजुरी करणाऱ्या सुनील धुर्वे यांच्या घराला अचानक आग लागली. यात सिलेंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. छत्रपती शिवाजी मैत्री संस्था पाळा यांनी पुढाकार घेऊन उद्योजक नवीनकुमार पेठे, नंदू नानोटकर, संजय आखरे, रुपेश मेश्राम, नितीन उमाळे, सागर ठाकरे, नीलेश लायदे, गौरव धोटे यांचे सहकाऱ्यातून सुनील धुर्वे यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला. यावेळी शिवाजी मैत्री संघटनेचे अध्यक्ष श्रेणीत राऊत, अंकित ठवळी, विनीत उबाळे, अमोल निस्वादे, अजय वानखडे, सुभाष पुसाम, अभिजीत मोहने, प्रज्ज्वल बिडकर, रंजीत उईके, विजय शिरसाम, नीलेश धुर्वे, रुपेश झोड, अभिलेश परिहार, अंकित गोहाड, प्रियांशू हारोडे, विकी उईके, कुंदन सातपाने, शुभम पांडागळे, जयेश घोडकी, बाबुराव मरसकोल्हे, गणेश शिरसाम, दीपक कवडे उपस्थित होते.

Web Title: A helping hand to the bereaved families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.