चांभार समाजातील निरक्षर अपंगांना मदत

By Admin | Updated: February 15, 2016 00:42 IST2016-02-15T00:42:04+5:302016-02-15T00:42:04+5:30

संत रविदास चांभार समाज जिल्हा विकास मंच अराजकीय सामाजिक संघटनेच्यावतीने धर्मगुरु संत रविदास महाराज यांच्या जयंती दिनी समाजातील निरक्षर,

Help for illiterate disabled in the crib community | चांभार समाजातील निरक्षर अपंगांना मदत

चांभार समाजातील निरक्षर अपंगांना मदत

पत्रपरिषद : संत रविदास महाराज जयंती
अमरावती : संत रविदास चांभार समाज जिल्हा विकास मंच अराजकीय सामाजिक संघटनेच्यावतीने धर्मगुरु संत रविदास महाराज यांच्या जयंती दिनी समाजातील निरक्षर, अपंग, दुर्लक्षित, वयोवृद्ध नागरिकांना मदत करण्यात येईल व निराधार विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यात मदत करण्यात येणार असल्याची माहिती शनिवारी येथील एका हॉटेलमध्ये पार पडलेल्या पत्रपरिषदेत देण्यात आली.
छत्रपती श्री शिवाजी महाराज व संत रविदास महाराज यांच्या जयंतीच्या निमित्त विविध कार्यक्रम राबविण्यात येईल असे संस्थापक अध्यक्ष प्रकाश खरूले यांनी सांगितले. यावेळी संघटक वासुदेव कोठेकर, जिल्हा महासचिव राजाभाऊ तायडे, युनूस खान, शेख शब्बीर शेख नज्जू, विश्वास विजयकर, सुधाकर टाले, अशोक वाटकर, ज्ञानेश्वर वाटकर, नितीन वाटाणे आदी उपस्थित होते. २२ फेब्रुवारी रोजी संत रविदास महाराज जयंतीनिमित्त बेलपुरा समाज मंदिरातून सकाळी १०.३० वाजता रॅली काढण्यात येणार असून सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होईल.

Web Title: Help for illiterate disabled in the crib community