मद्यधुंद शिक्षकांच्या कारने दुचाकीस्वारांना चिरडले

By Admin | Updated: February 10, 2016 00:19 IST2016-02-10T00:19:06+5:302016-02-10T00:19:06+5:30

वरूडहून परतवाड्याकडे चारचाकीने निघालेल्या चार मद्यधुंद शिक्षकांनी भरधाव कारने दुचाकीला धडक दिली.

With the help of drunk teachers, the two-wheeler collided with | मद्यधुंद शिक्षकांच्या कारने दुचाकीस्वारांना चिरडले

मद्यधुंद शिक्षकांच्या कारने दुचाकीस्वारांना चिरडले

परतवाडा : वरूडहून परतवाड्याकडे चारचाकीने निघालेल्या चार मद्यधुंद शिक्षकांनी भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील दोघे जखमी झालेत.
ही घटना अमरावती -परतवाडा मार्गावर अष्टमासिध्दीनजीक मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजतादरम्यान घडली. जखमींमध्ये ए.पी.झाकर्डे (रा. कांडली), सतीश मधुकर खडसे (रा. अमरावती) या दोघांचा समावेश आहे. ते दुचाकी एम.एच.२७- ए.क्यू. -७१४२ ने परतवाड्याहून अमरावतीकडे येत होते. वरूडहून परतवाडयाकडे भरधाव निघालेल्या कार एम.एच.०१-वाय.ए.-१४४८ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या कारने पुसला येथील बिरसामुंडा आश्रम शाळेचे शिक्षक सुरेश नागापुरे, प्रदीप देशमुख, प्रकाश ठाकरे, आमले हे चौघेजण परतवाड्याकडे निघाले होते. मद्यधुंद अवस्थेत त्यांनी मार्गावर अनेकांना धडक दिली. मात्र, उपरोक्त दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले.

Web Title: With the help of drunk teachers, the two-wheeler collided with

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.