अकोलीत हिंसक गाईचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2016 00:19 IST2016-05-21T00:19:39+5:302016-05-21T00:19:39+5:30

अकोली रोड व म्हाडा परिसरात हैदोस घालणाऱ्या हिंसक गाईवर महापालिकेच्या पथकाने तब्बल पाच तासांनंतर नियंत्रण मिळविले.

Hedos of violent cows | अकोलीत हिंसक गाईचा हैदोस

अकोलीत हिंसक गाईचा हैदोस

पाच तासांनंतर नियंत्रण : नागरिकांचा जीव भांड्यात
अमरावती : अकोली रोड व म्हाडा परिसरात हैदोस घालणाऱ्या हिंसक गाईवर महापालिकेच्या पथकाने तब्बल पाच तासांनंतर नियंत्रण मिळविले.
या गायीला बेशुद्ध करण्यात आल्यानंतर येथील नागरिकांचा जीव भांड्यात पडला. १९ मे रोजी पशुवैद्यकीय विभागास धामोरीकर यांनी याबाबत महापालिकेला कळविले होते. म्हाडा कॉलनी व अकोली परिसरात एक गाय हिंसक झाल्याने जीवित हानी होऊ शकते, अशा माहितीची गांर्भीयाने दखल घेऊन पशुवैद्यकीय विभागातील पथक निरीक्षक सागर गवई व मजूर घटनास्थळी पोहोचले. नागरिकांनीही या गाय पकडण्याचा प्रयत्न केला.
गाईने सात व्यक्ती व लहान मुलांसह कर्मचारी यांना जखमी केले होते. शर्तीने प्रयत्न करून ही गाय नियंत्रणात येत नसल्याने आयुक्त तिला पकडण्याची परवानगी घेऊन सदर गाईला बेशुद्ध करण्यासाठी वनविभागाची मदत घेण्यात आली. अमोल गावनेर व वानखडे यांच्यासह वनविभागाची रेस्क्यू टीम व सचिन बोंद्रे पशुवैधक यांनी घटनास्थळी सापळा रचून टेंग्यूलाईजर गनच्या सहाय्याने मारक्या गाईवर नियंत्रण मिळविले. ही गाय रेबीजग्रस्त असल्याचे प्राथमिक निरीक्षण आहे. कारवाईमध्ये निखिल तिवारी, बजरंग लोखंडे, रमेश बाप्पू, तोकीर भाई यांना जखमी व्हावे लागले, कार्यवाहीदरम्यान वनविभागाचे कर्मचारी वानखडे, सचिन बोंद्रे व निरीक्षक सागर गवई व वानखडे, फिरोज खान, अनिल शिंदे,, चंदु ढवळे, जफर, विठ्ठल वानखडे, रुपेश वानखडे, प्रफुल्ल लोखंडे यांनी मोलाचे प्रयत्न केले. ही कारवाई केल्यानंतर येथील शेकडो नागरिकांना दिलासा मिळाला असून त्यांनी महापालिकेसह वनविभागाच्या पथकाचे आभार मानले आहेत. या मोकाट गाईमुळे येथील नागरिकांचे घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते. याशिवाय महिला तरुणींना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या त्रासातून तूर्तास त्यांची मुक्तता झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Hedos of violent cows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.