शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

धामणगाव रेल्वे बाजार समितीत प्रचंड भ्रष्टाचार

By admin | Published: July 03, 2014 11:18 PM

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती व सचिवांनी प्रचंड भ्रष्टाचार केल्याचा आरोेप प्रताप अडसड यांनी गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेतून केला. अनियमितता, नियमबाह्य कामे,

धामणगाव रेल्वे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती व सचिवांनी प्रचंड भ्रष्टाचार केल्याचा आरोेप प्रताप अडसड यांनी गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेतून केला. अनियमितता, नियमबाह्य कामे, सभापतींनी मागील तीन वर्षांत ९ लाखांचा प्रवासभत्ता उचलल्याचा आरोपही अडसड यांनी केला. समितीच्या वार्षिक अहवालात ही बाब नमूद आहे़ या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी बाजार समितीचे संचालक प्रताप अडसड, मोहन इंगळे यांच्यासह सहा संचालकांनी पत्रकार परिषदेतून केली.कृषी उत्पन्न बाजार समितीत अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप करीत अडसड यांनी सन ११-१२ तसेच सन १२-१३ च्या मूूळ व पुरवणी अर्थसंकल्पामध्ये केलेली तरतूद व शीर्ष लक्षात घेता तसेच बाजार समितीचे वार्षिक अहवालामधील तरतुदी विसंगत आहेत. मंजुरीपेक्षा खर्च अधिक असून बऱ्याच महसुली खर्चाला पणन मंडळाची मंजुरी घेतलेली नाही़ परवानगीशिवाय व बजेटशिवाय बाजार समितीने हा खर्च केला आहे़बाजार समितीचे सभापती श्रीकांत गावंडे यांनी मागील तीन वर्षांत प्रवासभत्ता व अनामत रक्कम म्हणून ९ लाख ९१ हजार ४५५ रूपयांची उचल केल्याचे तीन वर्षांच्या वार्षिक अहवालात पहायला मिळते़ याबाबत चौकशी झाल्यास सभापतीने केलेला भ्रष्टाचार उघडकीस येऊ शकतो, असे प्रताप अडसड यांचे म्हणणे आहे. बाजार समितीने सन २०१० पासून तर सन २०१४ या चारही वर्षांत बाजार निधी अनुदान, विकासात्मक दंड, कर्ज, तसेच दैनंदिन खर्च याकरिता चेकद्वारे केलेले व्यवहार व नगदीने केलेले व्यवहार याचे प्रमाण ३०-७० असे आहे. ही बाब वित्तीय लेखा संहितेचे पूर्णत: उल्लंघन करणारी आहे़ ३० एप्रिल २०१४ रोजी बाजार समितीच्या मासिक सभेला संचालक लक्ष्मीनारायण चांडक हजर नसताना या सभेत ठराव क्रमांक दोनमध्ये जमा-खर्चाला सूचक मानून त्यांचे नाव दर्शविण्यात आले आहे. तक्रार जिल्हा उपनिंबधकांकडे केली आहे. चौकशीला सुरूवात झाल्याची माहिती प्रताप अडसड यांनी दिली़ पत्रपरिषदेला संचालक मोहन इंगळे, सुमन धांदे, दिलीप लांबाडे, सूरज परसोने उपस्थित होते.