‘त्या’ आरोपींच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ५ आॅगस्ट रोजी सुनावणी
By Admin | Updated: August 4, 2016 00:03 IST2016-08-04T00:03:44+5:302016-08-04T00:03:44+5:30
घोरपडीवर ताव मारणाऱ्या सहा आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला आहे.

‘त्या’ आरोपींच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ५ आॅगस्ट रोजी सुनावणी
घोरपडीवर ताव मारण्याचे प्रकरण : १५ दिवसांपासून आरोपी पसार
अमरावती : घोरपडीवर ताव मारणाऱ्या सहा आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला आहे. त्यांच्या जामीनवर आता ५ आॅगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. गुन्हा दाखल होऊन १५ दिवस ओलांडल आहे. मात्र अद्यापपर्यंत आरोपीला पकडण्यात वनविभागाला यश मिळाले नाही, हे विशेष.
पिंपळखुटा येथील संत्रा बागेत काही लब्जप्रतिष्ठांनी घोरपडीवर ताव मारला. नऊ आरोपींविरुध्द वनविभागाने गुन्हा नोंदविला. वनविभागाने चौकशी सुरु केल्यानंतर आरोपी शेतमालक मनोज जगताप, विलास डहाके, लेखापाल रवि इंगळे, लेखापाल शेखर कापसे, व्यवसायीक हेमंत जिचकार, शिक्षक आशिष अरुण बोबडे (छाबडा प्लॉट) व प्राध्यापक हेमंत दिवाकर देशमुख (चैतन्य कॉलनी) व मंगेश खोब्रागडे या नऊ आरोपींची नावे निष्पन्न झाली. मात्र अद्यापपर्यंत आरोपी वनविभागाच्या हाती लागले नाहीत. दरम्यान यातील सहा आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला. त्यावर २ आॅगस्ट रोजी सुनावणी होणार होती. मात्र, आरोपींच्या वकीलांनी न्यायालयात विनंती अर्ज सादर केल्याने न्यायालयाने ५ आॅगस्ट रोजी सुनावणीची तारीख दिली. वनविभागाचे पथके आरोपींच्या शोधात भटंकती करीत आहेत. मात्र अद्यापपर्यंत आरोपीचा सुगावा लागला नसल्याचे निदर्शनास आले आहे. सायबर सेलद्वारे आता तांत्रिक तपास वनविभागाने सुरु केला असून आरोपीना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली आहे.
आरोपींचे शोधकार्य सुरु आहे. सहा आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला आहे. २ आॅगस्ट रोजी सुनावणी होती. मात्र, आरोपींच्या वकिलांनी विनंती अर्ज केल्याने न्यायालयाने ५ आॅगस्ट पुढील सुनावणीची तारिख दिली आहे.
राजेंद्र बोंडे, सहायक उपवनसरंक्षक, अमरावती विभाग.