्न‘्न्नलोकमत’तर्फे आज अमरावतीत ‘हेल्दी बेबी कॅम्प’

By Admin | Updated: August 28, 2016 00:04 IST2016-08-28T00:04:09+5:302016-08-28T00:04:09+5:30

लहान मुलांच्या पालन पोषणाबद्दल जनजागृती करण्यासाठी जॉन्सन अँड जॉन्सन व 'लोकमत'तर्फे हेल्दी बेबी ....

'Healthy Baby Camp' in Amravati today | ्न‘्न्नलोकमत’तर्फे आज अमरावतीत ‘हेल्दी बेबी कॅम्प’

्न‘्न्नलोकमत’तर्फे आज अमरावतीत ‘हेल्दी बेबी कॅम्प’

जॉन्सन अँड जॉन्सनतर्फे संधी : लहान मुलांच्या पालनपोषणाबद्दल जनजागृती कार्यक्रम
अमरावती : लहान मुलांच्या पालन पोषणाबद्दल जनजागृती करण्यासाठी जॉन्सन अँड जॉन्सन व 'लोकमत'तर्फे हेल्दी बेबी कॅम्पचे आयोजन रविवार २८ आॅगस्ट रोजी अमरावती येथील अभियंता हॉल, शेगाव नाका चौक अमरावती येथे आयोजित करण्यात आले आहे.
सुदृढ निरोगी बाळप्रत्येक माता-पित्यांचे स्वप्न असते. चांगली व स्वस्थ मुले, निरोगी कुटुंब, जाणकार समाज आणि समृद्ध भारत अशा टप्प्याटप्प्याने विकसित होणारी आपली संस्कृती आणि त्यात घडविणे ही मोठी जबाबदारी जॉन्सन आणि जॉन्सन या भारतातील सर्वाधिक मातांचा लाडका ब्रॅन्ड आणि आपली सामाजिक बांधिलकी जपत क्रांती घडविणारे वृत्तपत्र म्हणजे 'लोकमत' यांनी या दृष्टीने हे पाऊल उचलून एक वेगळी संकल्पना ठेवली आहे. शंभरहून अधिक वर्षांसाठी जॉन्सन बेबी हे बाळाच्या शुश्रृषा विज्ञानांमध्ये आघाडीवर राहिले आहे. हा वारसा प्रदीर्घ आहे. ज्यातून पिढी दर पिढी प्रत्येक पालकाने आपल्या बाळाला दिलेला विश्वासाचा स्पर्श आहे. असा स्पर्श जो जोपासतो बाळाचे आरोग्य, बाळाचे निरोगीपण आणि मातापित्यांचा अतूट विश्वास आणि म्हणूनच जॉन्सनचे उत्पादन आईच्या मातृत्वावर आणि विज्ञानाच्या आधारावर निर्माण करण्यात आली असून जगभरातील हजारो मातांद्वारे खऱ्या अर्थाने घरांमध्ये त्याची चाचणी केली जाते. ज्यावर असतो मातेचा संपूर्णविश्वास, ज्या विश्वासावर तिचं बाळ घडत जातं. जॉन्सन अँन्ड जॉन्सन आणि 'लोकमत' वृत्तपत्र समूहाने आयोजित केलेला हा कॅम्प एका निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न होय. अशाप्रकारचे आयोजन सातत्याने केले जाते.
मागील वर्षी पण अशा पद्धतीचे कार्यक्रम संपूर्ण गोवा आणि महाराष्ट्रात राबविले गेले होते. ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. अशाप्रकारचे कार्यक्रम राबवून हेल्थ जागृती वाढवून येणाऱ्या पिढीला संजीवनी देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमांमार्फत होणार आहे हे निश्चित. तेव्हा या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन जागरुक पालकांची भूमिका निभावण्याची संधी या निमित्ताने जॉन्सन अँन्ड जॉन्सन व लोकमत यांनी दिली आहे. त्या संधीचा पुरेपूर फायदा समस्त पालकांनी घ्यावा आणि या कॅम्पला भव्यदिव्य स्वरूप प्राप्त करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहेत. आयएपी इंडियन अँकेडमी आॅफ पेडियाट्रिक्स, वर्धा ही भारतातील बालरोग चिकित्सकांची सर्वाधिक प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे जी आरोग्याच्या सुधारणेसाठी सतत झटत असते. (उपक्रम प्रतिनिधी)

कॅम्पमध्ये मिळणार सखोल मार्गदर्शन
या कॅम्पमध्ये आपल्या बाळांच्या आरोग्याशी संबंधित अनेक प्रश्नांचा विचार करुन त्यांवर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.
हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून, सर्व पालकांसाठी खुला आहे. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी लोकमत विभागीय कार्यालय,मोर्शी रोड, अमरावती येथे सकाळी १0 ते ५ दरम्यान करावी. अधिक माहितीसाठी ९९२२४२७७९४, ७३८७६७७५८५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तूंसह फोटो फ्रेम देणार
कॅम्पमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक बालकाला सर्टिफिकेट फोटो विथ फ्रेम जॉन्सनतर्फे आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक बालकांची तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त पालकांनी आपला शुन्य ते एक, एक ते तीन व तीन ते पाच या वयोगटातील बालकांना घेवून यावे. नाव नोंदणी लोकमत विभागीय कार्यालय,मोर्शी रोड, अमरावती येथे सकाळी १0 ते ५ दरम्यान करावी. अधिक माहितीसाठी ९९२२४२७७९४, ७३८७६७७५८५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Web Title: 'Healthy Baby Camp' in Amravati today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.