पीपीई किटला वैतागले आरोग्य कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:12 IST2021-04-07T04:12:33+5:302021-04-07T04:12:33+5:30
अमरावती : कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या पीपीई किटने उन्हाळ्यात वैताग आणला ...

पीपीई किटला वैतागले आरोग्य कर्मचारी
अमरावती : कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या पीपीई किटने उन्हाळ्यात वैताग आणला आहे. कोरोनाने नाही, तर या किटमुळे मरू, असा या आरोग्य कर्मचाऱ्यांचा सूर आहे. सहा तासांच्या कर्तव्यात त्वचेला त्रास होतो, तर घामाने जीव नकोसा होत असल्याचे या आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या जवळपास ४५ रुग्णालयांत कोरोनापासून बचाव करण्यासाठी पीपीई (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट) किटचा वापर केला जातो. कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात या कीट दर्जेदार होत्या. नंतर मात्र याचा दर्जा सुमार होत गेला. राज्यस्तरावर सर्व किट पुरविल्या जातात. या किटमुळे पाच मिनिटांत व्यक्ती घामाघूम होत असल्याचे आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
सहा तास अंगावर किट असल्याने हवा लागत नाही. सर्व घाम पायाच्या बुटात जमा होतो. या सर्व प्रकारामुळे आरोग्य कर्मचारी कंटाळले आहेत. काही जणांनी तर रिस्क घेऊन किटचा वापर करणे सोडले आहे. चेहऱ्याला मास्क अन् हातात ग्लोव्हज घालूू आरोग्य सेवा देत आहे. मात्र, काही रुग्णालयात किट ही घालावीच लागत आहे.
कोट
कोरोना केअर सेंटरमध्ये पुरेशी खेळती हवा नाही. त्यात पीपीई किट सहा तास घालावी लागत असल्याने आता वैताग आलेला आहे. दर १० मिनिटांनी ही किट काढावीशी वाटते. सध्या तरी काहीच उपचार नाही.
- एक आरोग्य कर्मचारी
कोट
आता उन्हाळा सुरू झालेला आहे. तापमान ४० अंशांवर गेले असताना पीपीई किट सहा तास अंगावर घालणे, यामुळे आता वैताग आला आहे. कोरोनाने नाही, तर या किट घातल्याने मरण येईल, असे वाटते.
- एक आरोग्य कर्मचारी
कोट
सहा तास अंगावर किट घालून राहणे हे एक दिव्यच आहे. अंगावर घाम येतो. त्यामुळे शरीराला खाज सुटते. अशावेळी किट काढून टाकावीशी वाटते. परंतु, दुसरा पर्यायदेखील नाही. आता या प्रकाराला कंटाळलो आहोत.
- एक आरोग्य कर्मचारी
पाईंटर
शासकीय रुग्णालयात रोज किटचा वापर :३५०
पाईंटर
एकूण कोरोनाबाधित : ५०,०६७
ॲक्टिव्ह रुग्ण : २,९४२
आतापर्यंत संक्रमणमुक्त : ४६,४३८
एकूण मृत्यू : ६८७
कोट
राज्यस्तरावरून या पीपीई किटचा पुरवठा होतो. रोज ३२५ पर्यंत कीट लागतात. सहा तास अंगात घालून कामे करावी लागतात. मागच्या उन्हाळ्यात सर्वांनी कीट घालून काम केले. यंदाही तीच परिस्थिती आहे.
डॉ. श्यामसुंदर निकम
जिल्हा शल्यचिकित्सक