एक महिन्यापासून आरोग्यसेवक रुजूच झाला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:11 IST2021-09-13T04:11:46+5:302021-09-13T04:11:46+5:30

ब्राह्मणवाडा थडी प्राथमिक आरोग्य केंद्रात अपुऱ्या मनुष्यबळावर कसरत ब्राह्मणवाडा थडी : चांदूर बाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी प्राथमिक आरोग्य केंद्रात ...

The health worker has not been hired for a month | एक महिन्यापासून आरोग्यसेवक रुजूच झाला नाही

एक महिन्यापासून आरोग्यसेवक रुजूच झाला नाही

ब्राह्मणवाडा थडी प्राथमिक आरोग्य केंद्रात अपुऱ्या मनुष्यबळावर कसरत

ब्राह्मणवाडा थडी : चांदूर बाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आधीच अपुऱ्या मनुष्यबळावर कसरत होत आहे. त्यात एक महिन्यापूर्वी नियुक्त केलेला आरोग्य सेवक रुजू झालेला नाही.

ब्राह्मणवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात २९ गावांचा समावेश आहे. एक महिन्यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रात एमपीडब्ल्यू अंतर्गत रामेश्वर खोडे यांची नियुक्ती झाली. तरीही ते रुजू झालेले नाही. कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्याला ताबडतोब रुजू होण्याचे निर्देश द्यावे, अशा आशयाचे निवेदन तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना प्रहार शाखाप्रमुख प्रशांत सातपुते, अक्षय औतकर, अविनाश काळे, प्रमोद इंगोले, अमोल फुसे, सुनील टेंभरे, प्रकाश सायंदे, साहेबराव अकोलकर, नीलेश औतकर, वासुदेव उडाके, योगेश नीचत, भास्कर सोनारे, सुनील दाते, संजय मेस्कर, पप्पू निचत या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी दिले आहे.

Web Title: The health worker has not been hired for a month