महिलेकडून आरोग्य अधिकाऱ्याला नालीतील घाणीचा अहेर
By Admin | Updated: December 8, 2014 22:28 IST2014-12-08T22:28:58+5:302014-12-08T22:28:58+5:30
तपोवन प्रभाग क्र. २ परिसरातील नागरी वस्त्यांमध्ये ठिकठिकाणी साचत असलेले सांडपाणी, तुंबलेल्या गटारांमुळे डेंग्यू हा जीवघेणा आजार बळावत आहे. सांडपाण्याचा कायमस्वरुपी निचरा करावा,

महिलेकडून आरोग्य अधिकाऱ्याला नालीतील घाणीचा अहेर
अमरावती : तपोवन प्रभाग क्र. २ परिसरातील नागरी वस्त्यांमध्ये ठिकठिकाणी साचत असलेले सांडपाणी, तुंबलेल्या गटारांमुळे डेंग्यू हा जीवघेणा आजार बळावत आहे. सांडपाण्याचा कायमस्वरुपी निचरा करावा, यासाठी लोकप्रतिनिधी सतत पाठपुरावा करीत असताना महापालिकेचा आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. परिणामी एका संतप्त महिलेने सोमवारी नालीतील गाळ काढून तो चक्क आरोग्य अधिकाऱ्यांना भेट देऊन समस्या चव्हाट्यावर मांडली.
तपोवन प्रभागाच्या नगरसेविका स्वाती निस्ताने यांनी परिसरातील समस्या, अस्वच्छेतेबाबत आरोग्य विभागाला अवगत केले. मात्र, नवीन कॉलन्यांमध्ये विकास कामे करण्यासाठी निधीची वानवा असल्याचे कारण पुढे केले जाते. सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने घरांजवळ घाण पाणी साचणे या परिसरात नित्याचीच बाब आहे. येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी या भागाला आरोग्य अधिकाऱ्यांनी एकदा तरी भेट द्यावी, असे नगरसेविका निस्ताने यांनी यापूर्वीही कळविले.