परीक्षार्थीचे आरोग्य बिघडले; हॉलतिकीट एकाचे, फाेटो दुसऱ्याचाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:13 AM2021-09-25T04:13:09+5:302021-09-25T04:13:09+5:30

अमरावती : महाराष्ट्र राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया पार पाडत आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. ...

The health of the examinee deteriorated; Holtikit belongs to one, Faeto belongs to the other! | परीक्षार्थीचे आरोग्य बिघडले; हॉलतिकीट एकाचे, फाेटो दुसऱ्याचाच!

परीक्षार्थीचे आरोग्य बिघडले; हॉलतिकीट एकाचे, फाेटो दुसऱ्याचाच!

Next

अमरावती : महाराष्ट्र राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया पार पाडत आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. आरोग्य विभागातील 'क' संवर्गातील पदासाठी २५ सप्टेंबर रोजी आणि 'ड' संवर्गातील पदासाठी २६ सप्टेंबर रोजी लेखी परीक्षा होणार आहे. मात्र, या परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना अनेक त्रुटींना समोर जावे लागत आहे. अनेकांना या परीक्षेचे हाॅलतिकीट प्राप्त झालेले नाही, तर अनेकांच्या ओळखपत्रावर दुसऱ्यांचे छायाचित्र अन् स्वाक्षरीही दुसऱ्याची आहे. काही विद्यार्थ्यांना प्राप्त झालेल्या ओळखपत्रावर सेंटरचे उल्लेख नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांपुढे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शासनाने भरती प्रक्रियेचे काम एका खासगी कंपनीकडे दिले आहे.

-------

जिल्ह्यातील एकूण परीक्षा केंद्र परीक्षार्थी वेळ

आरोग्य विभागातील 'क' संवर्गासाठी ४४ केंद्र १३,००० १० ते १२

आरोग्य विभागातील 'ड' संवर्गासाठी ६० केंद्र १८,५०० १२ ते २

----------------------------------------------------------------------------------------

काेट-

विद्यार्थी

मी 'ड' संवर्गासाठी अर्ज केला आहे. माझी परीक्षा रविवारी आहे. मात्र, मला माझे हॉल तिकीट अजून मिळालेले नाही. त्यासाठी इर्विन रुग्णालयात जाऊन आलो. मात्र, त्यांनी माझे समाधान केले नाही. तक्रारीकरिता जो नंबर दिला तो बंद होता. शनिवारपर्यंत मला प्रवेशपत्र नाही मिळाले तर परीक्षेपासून वंचित राहावे लागेल.

रोशन बारबुदे, चांदूर बाजार

-------------------------------------------------------------------------------------------------------------

मी 'क' आणि 'ड' या दोन्ही पदासाठी अर्ज केला आहे. मात्र मला 'क' संवर्गासाठी जे प्रवेश पत्र मिळाले त्यावर माझ्या छायाचित्राऐवजी दुसऱ्याचे छायाचित्र आहे आणि स्वाक्षरीसुध्दा दुसऱ्याची आहे. तक्रारीकरिता अनेकदा कॉल केला. मात्र, मला योग्य उत्तर मिळाले नाही.

- पवन नालेकर, अमरावती

---------------------------------------------------------------------------------------------

शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या परीक्षेची पूर्ण तयारी झाली आहे. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. काही विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्या त्याकरिता त्यांना आराेग्य विभागाच्या साईटवर दूरध्वनी क्रमांक दिला आहे. त्यावर संपर्क करावा, असे सांगण्यात आले.

- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक

---------------------------------------------------------------------------------------

शनिवार व रविवारी सार्वजनिक आरोग्य विभागातील 'क' आणि 'ड' संवर्गासाठी परीक्षा होत आहे. मात्र, प्रवेशपत्रात अनेक त्रुटी आहेत. काहींना अजून प्रवेशपत्र मिळाले नाही. राज्य सरकारने खासगी कंपनीकडे भरती प्रक्रियेचे काम दिले आहे. विद्यार्थांना होणाऱ्या त्रासाबद्दल ही कंपनी व राज्य सरकार जबाबदार आहे. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण जाऊ नये याकरीता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना निवेदन देण्यात आले.

- हर्षल ठाकरे, शहराध्यक्ष मनसे

Web Title: The health of the examinee deteriorated; Holtikit belongs to one, Faeto belongs to the other!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app