आरोग्य विभागाची दीड कोटींची औषधी खरेदी बारगळली

By Admin | Updated: September 30, 2015 00:27 IST2015-09-30T00:27:47+5:302015-09-30T00:27:47+5:30

जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आयुर्वेदिक व अ‍ॅलोपॅथीक केंद्राना पुरविण्यात येणाऱ्या ..

The health department has reduced the purchase of one and a half million medicines | आरोग्य विभागाची दीड कोटींची औषधी खरेदी बारगळली

आरोग्य विभागाची दीड कोटींची औषधी खरेदी बारगळली

मंजुरीसाठी प्रस्ताव नाही : वरिष्ठ स्तरावरही निर्णयाची प्रतीक्षा
अमरावती : जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आयुर्वेदिक व अ‍ॅलोपॅथीक केंद्राना पुरविण्यात येणाऱ्या औषधी खरेदीचा प्रस्ताव आरोग्य सेवा संचालक यांच्यास्तरावर बारगळून पडला आहे. यासोबतच औषध खरेदीसाठी जिल्हा परिषद आरोग्य समितीनंतर स्थायी समितीत मंजूरी साठी व त्यानंतर सर्वसाधारण सभेतही हा प्रस्ताव मंजुरीसाठी अद्यापही सादर करण्यात न आल्याने भविष्यात औषध टंचाईचा सामना करण्याची नामुष्की आरोग्य विभागावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्हा परिषद आरोग्य विभागा मार्फत जिल्हा भरात ५६ प्राथमिक आरोग्य केंद्र ३३३ आरोग्य उपकेंद्र ,६५ आयुर्वेक दवाखाने, आणि १८ अ‍ॅलोपॅथीक दवाखान्याना औषधीचा पुरवठा केला जातो. यासर्व आरोग्य यंत्रणेला औषधी पुरवितांना जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे वतीने साधारपणे मी ते जून महिन्यात जिल्ह्यासाठी लागणाऱ्या औषध खरेदीचा प्रस्ताव मंजूरीसाठी राज्याच्या आरोग्य सेवा संचालक यांच्याकडे पाठवावा लागतो. याला वरिष्ठ स्तरावरूण मंजूरी मिळताच शासकीय पॅनेलवर असलेल्या पुरवठा दारामार्फत औषधीचा पुरवठा केला जातो. जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जवळपास ३६७ प्रकारचे विविध औषधे पुरविण्यात येतात. मात्र मागील काही दिवसापासून अमरावतीसह इतर जिल्हा परिषदांनी औषध पुरवठयाचाजवळपास १ कोटी ८६ लाखाचा प्रस्ताव प्राथमिक स्तरावर सारोग्य सेवा संचालक कार्यालयाकडे पाठविला आहे. परंतु अद्याप कुठल्याही जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या औषध खरेदीच्या प्रस्तावास मंजूरी मिळाली नाही. यासोबतच जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत औषध खरेदीसाठी जिल्हा परिषदेच्या स्थायी व सर्वसाधारण सभेची मंजूरी घेण्यासाठी प्रस्ताव सभेच्या पटलावर ठेवावा लागतो मात्र हा प्रस्ताव अद्याप तरी मंजुरीसाठी सभागृहात आला नाही. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी औषध खरेदीचा मुद्दा निकाली न काढल्या गेल्यास जिल्हा औषध टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)

औषध खरेदीचा प्रस्ताव आरोग्य सेवा संचालक कार्यालयाकडे पाठविला आहे. त्याला लवकरच मंजूरी मिळेल आणि जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव येत्या सभेत ठेवला जाईल औषधाची कुठलीही टंचाई भासणार नाही
- नितीन भालेराव
जिल्हा आरोग्य अधिकारी अमरावती
आरोग्य केंद्रांना औषधी पुरविण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. मात्र यासाठी आरोग्य विभागाकडून खरेदीचा प्रस्ताव यापूर्वीच सादर करणे अपेक्षित होते.येत्या सभेत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आरोग्य अधिकाऱ्यांना दिले जातील.
-सतीश हाडोळे, उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती जिल्हा परिषद

Web Title: The health department has reduced the purchase of one and a half million medicines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.