अचलपूर पोलीस ठाण्यात आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:13 IST2020-12-24T04:13:05+5:302020-12-24T04:13:05+5:30
साडेतीनशे अधिकारी-कर्मचारी, नातेवाइकांची आरोग्य तपासणी परतवाडा : अचलपूर येथील पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी अधिकारी व त्यांच्या नातेवाइकांची आरोग्य तपासणी ...

अचलपूर पोलीस ठाण्यात आरोग्य तपासणी
साडेतीनशे अधिकारी-कर्मचारी, नातेवाइकांची आरोग्य तपासणी
परतवाडा : अचलपूर येथील पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी अधिकारी व त्यांच्या नातेवाइकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. साडेतीनशेपेक्षा अधिक कर्मचारी-अधिकारी, नातेवाइकांनी याचा लाभ घेतला. यादरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांनी आहार व इतर आजारांबाबत घ्यावयाच्या काळजीचे मार्गदर्शन केले.
पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांच्या नेतृत्वात उपविभागीय पोलीस अधिकारी पी.जे. अब्दागिरे व ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी १८ डिसेंबर रोजी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले. अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. जाधव, डॉ. प्रांजल जगताप, डॉ. शंकर दिलवाले (मेडिसीन), सर्जन डॉ. राहुल लोखंडे, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अनूप विधळे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. तनया देशमुख, फीजिशियन डॉ. अनिर्बान चक्रवर्ती, त्वचारोगतज्ज्ञ डॉ. निशा वर्मा, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. श्रद्धा तटटे, डॉ मानसी पाटील यांचा समावेश होता. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील ११, अचलपूर पोलीस ठाण्यातील ८०, परतवाडा पोलीस ठाण्यातील ७९, सरमसपुरा पोलीस ठाण्यातील ४०, आसेगाव पोलीस ठाण्यातील २८, पथ्रोट पोलीस ठाण्यातील ४९, शिरजगाव पोलीस ठाण्यातील ३६ अशा एकूण ३२३ जणांची तपासणी करण्यात आली.