शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अकोली स्मशानभूमीजवळ आढळला शिर नसलेला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 10:54 IST

Amravati : केवळ धड आढळले, खुनाचा गुन्हा, घटनास्थळी सत्तूर, चष्मा, चप्पल

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : अकोली गाव ते म्हाडा कॉलनी रोडवरील स्मशानभूमीसमोरील एका शिवारालगतच्या जंगलसदृश परिसरात गुरुवारी दुपारी शिर नसलेला मृतदेह आढळून आला. दुपारी दोनच्या सुमारास उघड झालेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली असून, याप्रकरणी, खोलापुरी गेट पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मृतदेहापासून वेगळे केलेल्या डोक्याच्या भागाचा शोध चालविला आहे. मृताची ओळख अद्यापपर्यंत पटलेली नाही. अज्ञात आरोपीने त्या अज्ञात व्यक्तीच्या गळ्यावर सत्तुरने वार करून त्याचे शिर धडावेगळे केले. धड घटनास्थळीच फेकून देत शिर इतरत्र फेकले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

शिराविना असलेल्या त्या अनोळखी मृताचे वय ५० ते ६० वर्षे असावे, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. यादव नामक शेतमालकाच्या शेताच्या कुंपणापासून आत जाणाऱ्या पाऊलवाटेशेजारी एका इसमाचा मृतदेह शिराविना आहे. तथा शिर गायब आहे, अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. त्या माहितीच्या आधारे खोलापुरी गेटचे ठाणेदार गौतम पातारे हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिस उपायुक्तद्वय गणेश शिंदे व कल्पना बारवकर यांच्यासह सहायक पोलिस आयुक्त जयदत्त भंवर, गुन्हे शाखेचे निरीक्षक गोरखनाथ जाधव व सीमा दाताळकर, सीआययूचे प्रमुख एपीआय महेंद्र इंगळे हेदेखील घटनास्थळी पोहोचले. खोलापुरी गेट पोलिसांनी त्या परिसरात सर्चिग करत रक्ताने माखलेला सत्तूर, दोन वेगवेगळ्या ठिकाणी पडलेला चपलेचा जोड व चष्मा जप्त केला. मृतदेहाच्या अंगावर शर्ट व पायजमा असे कपडे आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना देखील पाचारण करण्यात आले. श्वानपथकाने परिसरातील देशी दारू दुकानापर्यंत धाव घेतली. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. पोलिसांनी युद्धस्तरावर मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, मृतदेहाचे शिर देखील शोधले जात आहे. घटनास्थळाहून काही अंतरावर एक मोठी विहीर तथा अकोली रेल्वे स्टेशनदेखील आहे. धडापासून वेगळे केलेले शिर आरोपीने कुठे फेकले असावे, त्या सर्व शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी सर्चिग सुरू केली आहे. सोबतच, परिसरातील नागरिकांना देखील विचारणा केली जात आहे. मिसिंग सुद्धा तपासले जात आहेत. मृतदेह इर्विनच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. 

"धारदार शस्त्राने शिर वेगळे केलेला व घटनास्थळी ते शिर नसलेला एक मृतदेह अकोली रोडवरील स्मशानभूमीलगत आढळून आला. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. शिरदेखील मिळालेले नाही. अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला."- गौतम पातारे, ठाणेदार, खोलापुरी गेट

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती