‘तो’ नियोजित बालविवाह थांबविणार!

By Admin | Updated: December 27, 2014 22:42 IST2014-12-27T22:42:42+5:302014-12-27T22:42:42+5:30

तीन महिन्यांनंतर यशोदानगरात होणारा बालविवाह थांबविण्याचे प्रयत्न चाईल्ड लाईनकडून सुरु झाले असून ‘त्या’ अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांना समुदेशन करण्यात येईल. बालविवाहाची प्रथा गेल्या

'He will stop' planned child marriage! | ‘तो’ नियोजित बालविवाह थांबविणार!

‘तो’ नियोजित बालविवाह थांबविणार!

वैभव बाबरेकर - अमरावती
तीन महिन्यांनंतर यशोदानगरात होणारा बालविवाह थांबविण्याचे प्रयत्न चाईल्ड लाईनकडून सुरु झाले असून ‘त्या’ अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांना समुदेशन करण्यात येईल. बालविवाहाची प्रथा गेल्या कित्येक वर्षांपासून बंद झाली असतानाही अमरावती शहरात छुप्या मार्गाने बालविवाह होत असल्याचे यावरून निदर्शनास येत आहे.
हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील चाईल्ड लाइनच्यावतीने आयसीडीसी प्रकल्पांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. बहुजन हिताय संस्था व आयसीडीसीच्या प्रकल्प अधिकारी वंदना चौधरी यांच्या संयुक्त विद्यमाने किशोरवयीन मुला-मुलींना लैंगिक शोषणावर अंगणवाडी सेविका मार्गदर्शन करतात. तसेच त्यांना प्रशिक्षण देण्याचे कार्य करीत आहेत. या प्रकल्पाद्वारे हा बालविवाह थांबविण्याची तयारी सुरू आहे.
चाईल्ड लाईनच्या प्रयत्नाचे फलित
त्याअनुषंगाने काही दिवसांपूर्वी अंगणवाडीसेविकांच्या माध्यमातून रमाबाई आंबेडकरनगर व फ्रेजरपुरा परिसरात किशोरवयीन मुलींना प्रशिक्षण देणे सुरु असताना यशोदानगरात एका १५ वर्षीय मुलीचा विवाह होत असल्याची माहिती चाईल्ड लाईनच्या मिळाली. हा विवाह तीन महिन्यानंतर होणार असल्यामुळे हा विवाह थांबविण्यासाठी प्रयत्न चाईल्ड लाइनचे समन्वयक प्रशांत गुलक्षे करीत आहेत.

Web Title: 'He will stop' planned child marriage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.