बसमध्ये चढताना पाकीट चोरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:12 IST2021-07-28T04:12:54+5:302021-07-28T04:12:54+5:30
मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक मोर्शी : चारचाकी मालवाहून वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी झाल्याची घटना गुजरी बाजारात २६ जुलै ...

बसमध्ये चढताना पाकीट चोरला
मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक
मोर्शी : चारचाकी मालवाहून वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी झाल्याची घटना गुजरी बाजारात २६ जुलै रोजी घडली. अमोल दिलीप शेरेकर (२१, रामजीबाबा नगर) यांच्या तक्रारीवरून पीकअप वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.
-----------------
विवाहितेला माहेरी येऊन मारहाण
अंजनगाव सुर्जी : क्षुुल्लक कारणावरून उदभवलेल्या वादातून माहेरी गेलेल्या पत्नीला पतीने शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना भालदारपुरा संगत संस्थान येथे महिनाभरापूर्वी घडली. समझोता होण्याच्या प्रतीक्षेनंतर विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून अंजनगाव पोलिसांनी हफीज खा हमीद खा, समीर खा शाहरुख खा, हमीद खा शफीक खा हमीद खा (सर्व रा. अजीजपुरा) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
--------------
अवैध रेती वाहून नेताना ट्रॅक्टर जप्त
शिरजगाव कसबा : बहिरम मार्गावर अवैधरीत्या रेती वाहून नेताना आढळलेला ट्रॅक्टर रेतीसह शिरजगाव कसबा पोलिसांनी २६ जुलै रोजी पेट्रोलिंगदरम्यान ताब्यात घेतला. आरोपी चालक शोभेराव छत्रू कासदेकर (४५, कारंजा बहिरम) राजेश जनार्दन डोके (२७, रा. सर्फापूर) व देवराव मावस्कर विरुद्ध गुन्हा नोंदविला. दोघांना अटक केली असून, देवराव हा पसार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
--------------
घरातून २६ हजारांचा मुद्देमाल लंपास
वरूड : लग्नानिमित्त बाहेरगावी गेल्याची संधी पाहून चोरट्याने घरातील एलईडी, मोबाईल, स्पिकर आदी २६ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना २४ ते २५ जुलै दरम्यान घडली. मनोहर नत्थुजी चौधरी (६३, वरूड) यांच्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
------------------
बाजारात खरेजी करताना मोबाईल लांबविला
अंजनगाव सुर्जी : बाजारात खरेदी करीत असल्याचे बघून चोरट्याने वरील खिशातून मोबाईल लंपास केल्याची घटना २६ जुलै रोजी स्थानिक आठवडी बाजारात घडली. दत्ता रामेश्वर गावंडे (३५, रा. भुसरखेडा) यांच्या तक्रारीवरून अंजनगाव पोलिसांनी अज्ञाताविद्ध गुन्हा नोंदविला.
--------------------
४३ हजारांच्या बकऱ्या पळविल्या
चांदूर रेल्वे : गोठ्यात बांधून बकऱ्या रात्री २ वाजता दरम्यान लंपास केल्याची घटना उघडकीस आली. शेख अज्जू शेख रहिम (५५, रा. सावंगी मगरापूर) यांच्या तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला. पुढील तपास पोलीस करीत आहे.
----------------------