पत्नीच्या रागावर ‘त्याने’ उलटवला आॅटो

By Admin | Updated: February 18, 2017 00:07 IST2017-02-18T00:07:08+5:302017-02-18T00:07:08+5:30

पत्नीला मारहाण केल्यानंतर मद्यपी पतीने हातात तलवार घेऊन धुमाकूळ घातला आणि आॅटोरिक्षांची तोडफोड केली. ही घटना शुक्रवारी सकाळी रामपुरी कॅम्प परिसरात घडली.

'He' reversed his wife's anger | पत्नीच्या रागावर ‘त्याने’ उलटवला आॅटो

पत्नीच्या रागावर ‘त्याने’ उलटवला आॅटो

रामपुरी कॅम्प परिसरातील घटना : हातात तलवार घेऊन धुमाकूळ
अमरावती : पत्नीला मारहाण केल्यानंतर मद्यपी पतीने हातात तलवार घेऊन धुमाकूळ घातला आणि आॅटोरिक्षांची तोडफोड केली. ही घटना शुक्रवारी सकाळी रामपुरी कॅम्प परिसरात घडली.
पोलीस सूत्रांनुसार, अशोकनगरातील रहिवासी नऱ्या ऊर्फ नरेश आत्राम याचा शुक्रवारी सकाळी पत्नीशी वाद झाला. त्यात नऱ्या आत्रामने पत्नीला बेदम मारहाण करीत दगडाने तिचे डोके फोडले. यानंतर चेकाळलेल्या नऱ्या आत्रामने रामपुरी कॅम्प परिसरातील नागरिकांना शिवीगाळ सुरू केली. हातात तलवार घेऊन त्याने रामपुरी कॅम्प परिसरातील मिठ्ठू चौकात उभ्या असलेल्या आॅटोरिक्षांची तोडफोड सुरू केली. दोन आॅटोरिक्षांच्या काचा फोडून त्याने दोन्ही आॅटो उलटविले. नऱ्या आत्रामच्या हातात तलवार असल्यामुळे कोणीही त्याला अडविण्यास धजावले नाही. अखेर या प्रकाराची माहिती काही नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली.
नऱ्या आत्रामचा हा धुमाकूळ तब्बल अर्धातास सुरू होता. काही वेळात ‘सीआर’ मोबाईल व्हॅन घटनास्थळी दाखल झाली. आरोपी नऱ्या हा पोलिसांच्या अंगावरदेखील धावून गेला. काही वेळात गाडगेनगरचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी पुंड यांच्यासह काही पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचा ताफा वाढत असल्याचे पाहून नऱ्या आत्रामने तेथून पळ काढला. याप्रकरणी नऱ्या आत्रामच्या पत्नीच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी त्याच्याविरूद्ध भादंविच्या कलम ४९८, ३२४, ४२७ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. याप्रकारामुळे रामपुरी कॅम्प परिसरात खळबळ उडाली होती. (प्रतिनिधी)

Web Title: 'He' reversed his wife's anger