पाठीत रुतलेला चाकू घेऊन ‘तो’ पोहोचला रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:10 IST2021-07-04T04:10:12+5:302021-07-04T04:10:12+5:30

फोटो - आहे. अमरावती : ग्राहकाने वादावादीतून पानठेलाचालकाला चाकू मारला. पाठीत रुतून बसलेला चाकू घेऊनच तो जिल्हा सामान्य रुग्णालयात ...

He reached the hospital with a knife in his back | पाठीत रुतलेला चाकू घेऊन ‘तो’ पोहोचला रुग्णालयात

पाठीत रुतलेला चाकू घेऊन ‘तो’ पोहोचला रुग्णालयात

फोटो - आहे.

अमरावती : ग्राहकाने वादावादीतून पानठेलाचालकाला चाकू मारला. पाठीत रुतून बसलेला चाकू घेऊनच तो जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाला. ही घटना शनिवारी दुपारी फ्रेजरपुरा परिसरातील पंचशीलनगरात रात्री ८.३० वाजता घडली.

सचिन वानखडे (२५) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याच्या पानठेल्यावर नियमित ग्राहक असलेल्या युवकाने खर्र्याची मागणी केली. मात्र, त्याच्याकडे पूर्वीचीच उधारी असल्याने सचिनने खर्रा देण्यास नकार दिला. त्यामुळे वादवादी झाली. हे पाहून सचिनचे वडील मध्यस्थीसाठी दाखल झाले. मात्र, त्यांनाही न जुमानता त्या युवकाने सचिनवर चाकू उगारला. त्याच्या पाठीत खुपसला. यानंतर घटनास्थळावरून पलायन केले. चाकू पाठीत खोलवर रुतल्याने तो काढण्याचा खटाटोप न करता सचिनने तडक जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. तेथे त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहे. फ्रेजरपुऱ्याचे ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांच्या नेतृत्वात कारवाई होत आहे.

Web Title: He reached the hospital with a knife in his back