त्याने केला थेट विवाहित महिलेस प्रपोज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:10 IST2021-06-03T04:10:17+5:302021-06-03T04:10:17+5:30
अमरावती : महिलेच्या मुलाला ती काम करीत असलेल्या दवाखान्या नेऊन महिलेल्या मनात प्रेम दर्शविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका युवकाने थेट ...

त्याने केला थेट विवाहित महिलेस प्रपोज
अमरावती : महिलेच्या मुलाला ती काम करीत असलेल्या दवाखान्या नेऊन महिलेल्या मनात प्रेम दर्शविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका युवकाने थेट विवाहाची गळ घातली. हा प्रकार ३१ मे रोजी रोहिनी पार्कजवळील एका दवाखान्यात घडला. महिलेच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला.
दिलीप मेंढे (४०, रा. अमरावती) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी मंगळवारी भादंविचे कलम ३५४ (ड), ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला. आरोपी फिर्यादी महिलेच्या घरी गेला. त्याने महिलेच्या मुलाला सोबत घेतले. तो ती काम करीत असलेल्या ठिकाणी पोहचला. मुलाला बघून महिला बाहेर आली. येथे कसा आला, असे विचारले असता, सदर मामासोबत आल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर मला तुझ्याशी बोलायचे आहे. माझे तुझ्यावर प्रेम आहे. मला लग्न करायचे आहे, असे म्हणू लागला. त्यानंतर महिला येथून निघून गेली. तिने आरोपी कुठे राहतो, हे शोधले. माझे बदनामी करू नको, असे म्हटले असता त्याने विनयभंग केला. तसेच महिलेला धमकीसुद्धा दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पीएसआय मनीषा सामटकर करीत आहेत.