मद्यपीने सापासोबत खेळून त्याचे मुंडके तोडले
By Admin | Updated: August 26, 2015 00:11 IST2015-08-26T00:11:38+5:302015-08-26T00:11:38+5:30
घरात साप निघाला असता एका ३९ वर्षीय मद्यपीने त्याला हातात पकडून त्याच्या तोंडात हात टाकून मंडकं तोडले. ही घटना बेनोडा पोलीस ठाण्यांतर्गत तलोटी येथे घडली.

मद्यपीने सापासोबत खेळून त्याचे मुंडके तोडले
तलोटी येथील घटना : उपचारादरम्यान मृत्यू
वरूड : घरात साप निघाला असता एका ३९ वर्षीय मद्यपीने त्याला हातात पकडून त्याच्या तोंडात हात टाकून मंडकं तोडले. ही घटना बेनोडा पोलीस ठाण्यांतर्गत तलोटी येथे घडली.
हा प्रकार धोकादायक असल्याची पुसटशी कल्पना मद्यपी इसमाला नव्हती. मात्र शेजाऱ्यांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना २४ आॅगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजतादरम्यान घडली.
सर्पदंशाने मरण पावलेल्या इसमाचे नाव रामदास देवकू उईके असे आहे. तीन फूट लांबीच्या सापाला चक्क हातात पकडून त्याचेसोबत काही वेळ खेळला. खेळताखेळता मद्यपीने सापाच्या तोंडात हात टाकला आणि त्याचे मुंडकेच तोडले. परंतु साप चावल्याची मद्यपीला कल्पना नव्हती. शेजाऱ्यांनी त्याला ग्रामीण रुगणलयात रात्रीच दाखल केले. परंतु उपचारादरम्यान रामदासचा मृत्यू झाला. चावलेला साप कोणत्या जातीचा, याची माहिती तो देऊ शकला नाही. अखेर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे वरूड तालुक्यात शोककळा पसरली आहे. दारूच्या धुंदीत केलेला प्रकार जीवावर बेतला आहे. (तालुका प्रतिनिधी)