‘तो’ मृत वाघ मध्य प्रदेशातील!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:24 IST2021-02-05T05:24:28+5:302021-02-05T05:24:28+5:30
फोटो पी २५ टायगर नावाने पान २ किंवा पान ४ ची लिड अनिल कडू परतवाडा : मेळघाट व्याघ्र ...

‘तो’ मृत वाघ मध्य प्रदेशातील!
फोटो पी २५ टायगर नावाने
पान २ किंवा पान ४ ची लिड
अनिल कडू
परतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत रायपूर वनपरिक्षेत्रात मृतावस्थेत आढळून आलेला तो वाघ मध्य प्रदेशातील असून, मेळघाट भ्रमंतीवर असताना त्याच्यासोबत घातपात घडल्याची शक्यता आहे. २० जानेवारीला हा वाघ मृतावस्थेत आढळून आला होता. मृत्यूनंतर त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू झाले आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प संचालनालयाकडून उपलब्ध जवळपास साडेचारशे वाघांच्या आयडी तपासण्यात आल्या. यात मध्य प्रदेशातील सातपुडा टायगर रिझर्व्ह, होशंगाबाद, बोर व्याघ्र अभयारण्य, वर्धा, टिपेश्वर अभयारण्य, यवतमाळ अन्य व्याघ्र अभयारण्यातील आणि मेळघाट व्याघ्र अभयारण्यामधील आयडी प्राप्त वाघांसोबत त्या वाघाची ओळख जुळली नाही. वाघ मेळघाट बाहेरील आहे. तो मध्य प्रदेशातील प्रादेशिक वनातील आहे. बैतूल जिल्ह्यातील जंगलाकडून त्याने मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले आहे.
तो वाघ चौराकुंड वनपरिक्षेत्रातून रायपूरकडे पोहोचला. मध्य प्रदेशातून आलेला आणि चौराकुंडमध्ये भ्रमंतीवर असताना हा वाघ अनेकांना दिसला. मृत्यूपूर्वी या वाघाला काहींनी कॅमेरा बंदही केले. कॅमेरात पंधरा दिवसांपूर्वी टिपले गेलेले छायाचित्र फेसबूकसह समाज माध्यमांवर काहींनी व्हायरलही केले. ते छायाचित्र मृत वाघाच्या छायाचित्रासोबत जुळले आहे. मध्य प्रदेशातून मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील चौराकुंड रायपुर वनपरिक्षेत्रात भ्रमंती करून तो वाघ स्वत:चे बस्तान बसविण्याचा प्रयत्नात होता. स्वत:च स्वत:ची टेरिटरी निश्चित करण्याच्या प्रयत्नात त्याच्यासोबत ही घातपाताची घटना घडली.
कोट
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील आयडी प्राप्त वाघांसोबत मृत वाघाची ओळख पटलेली नाही. तो वाघ मेळघाटातील नाही. तो मध्य प्रदेशातून आला आहे.
एम.एस. रेड्डी
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक
मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती
कोट
प्रत्येक व्याघ्र प्रकल्पांतर्गत तेथील वाघांचा फोटो अल्बम कॅमेराट्रॅपमुळे उपलब्ध आहे. त्यांना नंबर देण्यात आले आहेत. वाघाच्या अंगावरील काळ्या पट्ट्यांवर देशभर वाघांची स्वतंत्र ओळख निश्चित होते. एका वाघाच्या अंगावरील काळे पट्टे अन्य कुठल्याही वाघाशी जुळत नाहीत. व्याघ्र प्रकल्पांत बाहेरील प्रादेशिक वनविभागातील वाघांचे फोटो अल्बम उपलब्ध नाहीत.
जयंत वडतकर, मानद वन्यजीव रक्षक, अमरावती
कोट
मध्य प्रदेशातून तो वाघ मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील चौराकुंड परिसरात दाखल झाला. चौराकुंड रायपूर क्षेत्रातील भ्रमंतीदरम्यान बस्तान बसविण्याच्या प्रयत्नात असताना त्याच्यासोबत हा घातपात घडला. मृत्यूपूर्वी चौराकुंड वनपरिक्षेत्रात त्याचे छायाचित्र कॅमेऱ्यात टिपले गेले आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प संचालनालयाकडे उपलब्ध जवळपास ४५० आयडी प्राप्त वाघांच्या छायाचित्रांसोबत त्याचे छायाचित्र जोडून बघितले गेले. ते जुळले नाही.
- विशाल बनसोडे, मानद वन्यजीव रक्षक, अमरावती
---------