हाकर्स झोनचा ताप अन् रहदारीचा वाढला व्याप
By Admin | Updated: May 2, 2015 00:28 IST2015-05-02T00:28:35+5:302015-05-02T00:28:35+5:30
महापालिकेच्या हद्दीत शहराचे हृदयस्थान म्हणून अंबापेठ प्रभाग क्र. १२ ओळखला जातो. ..

हाकर्स झोनचा ताप अन् रहदारीचा वाढला व्याप
अमरावती : महापालिकेच्या हद्दीत शहराचे हृदयस्थान म्हणून अंबापेठ प्रभाग क्र. १२ ओळखला जातो. या प्रभागात जवळपास २५ हजारांहून अधिक व्यावसायिक मालमत्ता करधारक आहेत, पाच हजारांच्या आसपास निवासी मालमत्ता करधारक वास्तव्यास आहेत. महापालिकेला सर्वाधिक विविध प्रकारचे कर देणाऱ्या या प्रभागात सर्वात महत्त्त्वाची समस्या म्हणजे हॉकर्स झोनची मोठी डोकेदुखी ठरत आहे. परिणामी शहराचे कानाकोपऱ्यातून मुख्य बाजारपेठेत दररोज लाखो नागरिक येतात. मात्र, त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे या प्रभागातील हॉकर्स झोन, रहदारी, अतिक्रमण आणि पार्किंगची मोठी समस्या सर्वांसाठीच डोकेदुखीची ठरत आहे. महापालिका प्रशासनाने यावर तोडगा काढणे निकडीचे असताना याकडे दुर्लक्ष होत आहे.
अडथळा : वाहने हॉकर्स रस्त्यावरच
अंबापेठ प्रभागातील शाम चौक ते सरोज चौक हा मार्ग अंऊद आहे. अशातच या मार्गावर नेहमीच बाजारपेठ असल्याने दररोज शहरासह शहरा बाहेरील नागरिक व ग्राहकांची गर्दी असते . परंतु या मार्गावर रस्त्यावर असलेले हॉकर्स व्यावसायीक व वाहने उभी केली जात असल्याने रहदारीस अडचणीचा सामना करावा लागतो त्यामुळे महापालिका प्रशासनाने अशा भागात हॉकर्स झोनची वाढती समस्या निकाली काढणे आवश्यक आहे.बाजारपेठेत नागरीकांना वाहने उभी करण्यासाठी पार्कीगची व्यवस्था करणे,वाढती रहदारी व बाजारपेठेत होणारी नागरीकांनी गर्दी यांच्या हिताचे दुष्टीने हॉकर्स झोनचा प्रश्न सोडविणे महत्वाचे आहे.
असहयोग : कचरा साठवणीची समस्या कायम
अंबापेठ प्रभागातील अमरावती तहसील कार्यालय, मुख्य डाक कार्यालयासमोर नागरिकांना अनावश्यक कचरा टाकण्यासाठी महापालिकेने कंटेनेटरची व्यवस्था केली आहे. मात्र या ठिकाणी अनावश्यक कचरा खाली टाकला जात असल्याने याचा फटका नागरिकांनाच बसत आहे. त्यामुळे महापालिकेने कचरा विल्हेवाटीसाठी ठेवलेल्या कंटेनरचा उपयोग करून महापालिका व प्रभागाच्या स्वच्छतेसाठी सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे.
दुर्लक्ष : लोकप्रतिनीधींच्या पत्राची बेदखल
नेहरू मैदानात पूर्वीच्या नगरपरिषदेचे व आताचे महापालिकेचे उद्यान आहे. यामध्ये राष्ट्रमाता क स्तुरबा गांधी यांचा पुतळा आहे. विविध प्रकारचे मोठे वृक्ष, खेळण्याचे साहित्य आहेत. मात्र या उद्यानाला विकासाची दिशा देणे गरजेचे आहे. यासाठी या प्रभागाचे नगरसेवक दिनेश बुब यांनी वेळोवेळी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून उद्यान विकासासाठी निधी व आवश्यक उपाययोजनांची मागणी केली असता प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. नेहरू मैदान व प्रभागातील इतरही उद्यानांचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
अशी आहे प्रभागाची रचन्
अंबापेठ प्रभागात इर्विन चौक ते मालविय चौक, चित्रा चौक ते इतवारा बाजार, जवाहर गेट ते बस स्थानक, गांधी चौक, अंबागेट, भूतेश्र्वर चौक, चुनाभट्टी, राजापेठ दीपार्चन, भारतीय महाविद्यालय, बुटी प्लॉट, मुधोळकरपेठ, राजापेठ, सिटी कोतवाली पोलीस स्टेशन, तारासाहेब बगीचा, अंबापेठ, रायली प्लॉट, हार्वे सभागृह कम्पाउड, सरोज चौक, प्रभात चौक, बापट चौक, नगत वाचानालय परिसर, अमरावती तहसील कार्यालय, हे परिसर या प्रभागात समाविष्ट आहेत. या प्रभागाची खास वैशिष्टे म्हणजे शहराची मुख्य बाजारपेठ असल्याने अनेक प्रकारचे व्यावसायिक प्रतिष्ठाने, आहेत याशिवाय बालाजी मंदिर, सतीधाम मंदिर, गोपाळकृष्ण मंदिर, अंबापेठ येथील राम मंदिर, बुटी प्लॉट गुरूव्दारा, संकट मोचन हनुमान मंदिर, प्रभात चौकातील रामदेव बाबा मंदिर, भारतीय महाविद्यालय, मनिबाई गुजराथी हायस्कूल, भारतीय विद्यालय, नुतन कन्या हायस्कू ल, मनपा हिंदी, मराठी मुला-मुलींची शाळा अशी बरीच वैशिष्ट्ये या प्रभागाची आहेत.